दीपिका पादुकोण हिची JNU भेट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर ; #BoycottChhpaak vs #IsupportDeepika म्हणत सुरु झाला ट्विटवॉर
#BoycottChhapaak trends on Twitter (Photo Credits: Twitter)

जेएनयू (JNU) येथे झालेल्या हल्ल्यांनंतर देशभरातून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. अनेक विद्यार्थी संघटना , तरुणाई सहित बॉलिवूड कलाकार मंडळी देखील रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत, यामध्ये काल बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने सुद्धा दिल्ली (Delhi) येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उपस्थिती दर्शवली. याठिकाणी उपस्थित विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी घोषणाबाजी करत असताना दीपिका सुद्धा सहभागी झाली होती, वास्तविक अशा प्रकारच्या आंदोलनात सहभाग घेणे हा तिचा वैयक्तिक मुद्दा असला तरी याचे तीव्र पडसाद आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत, आज सकाळपासून दीपिकाच्या भेटीवर काही जणांनी दीपिका ला पाठिंबा देत तर काही जणांनी तिच्या विरुद्ध जाऊन छपाक या आगामी चित्रपटाला बॅन करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर #BoycottChhpaak व #IsupportDeepika हे हॅशटॅग प्रचंड व्हायरल होत आहेत. दीपिका पादुकोण पोहचली JNU मध्ये; नोंदवला विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध, पहा Video

दीपिकाच्या चाहत्यांनी सुद्धा तिच्या कालच्या भेटीचा विरोध केला आहे, काहींनी मला दीपिका फार आवडते मात्र ज्या ठिकाणहुन केवळ देशविरोधी घोषणा देण्याचे काम केले जाते त्यांचे समर्थन तिने करणे आवडलेले नाही असे म्हणत आपले मत दिले आहे, तर दुसरीकडे दीपिकाकडून बॉलिवूड च्या ज्येष्ठ कलाकार मंडळींनी काहीतरी शिकवण घेतली पाहिजे असे तिच्या समर्थकांनी म्हंटले आहे.

पहा या ट्विट वॉरचे मुद्दे

#BoycottChhpaak

#IsupportDeepika

दरम्यान, दीपिकाने या मुद्द्यांवर बोलणे टाळले असले तरी यापूर्वी जेव्हा तिला जेएनयू हिंसाचाराबद्दल विचारणा केली होती, तेव्हा तिने 'आम्ही स्वतःला व्यक्त करण्यास घाबरत नाही याचा मला गर्व आहे. जे कोणी स्वतःची मते व्यक्त करत आहे त्यांच्याबद्दल मला अभिमान आहे. मला वाटते की आता आपली विचारधारा काहीही असो मात्र आम्ही देश आणि त्याच्या भविष्याबद्दल विचार करीत आहोत आणि ही चांगली गोष्ट आहे.'असे मत मांडले होते.