Carry On Jatta 3: स्मीप कांग दिगदर्शित कॅरी ऑन जट्टा 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळवले आहे. अभिनेता गिप्पी ग्रेवाल आणि अभिनेत्री सोनम बाजवा हे दोघेही कॅरी ऑन जट्टा ३या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चांगलीच मेहनत घेतली. बिग बॉस ओटीटी 2 ला प्रमोशन साठी आले होते. हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला. आणि अगदी कमी दिवसांत या चित्रपटाने 2 कोटीहून अधिक कमाई केल्याचे समोर आले आहे.
चित्रपटातील एका सीन मुळे हिंदूंच्या भावना दुखावले आहेत. असा आरोप दिग्दर्शक आणि कलाकारांवर केला आहे. या चित्रपटात एक आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आले आहे ज्यामध्ये हवन कुंड चालू असताना गिप्पी ग्रेवाल, बिन्नू ढिल्लन आणि गुरप्रीत घुग्गी येवून पाणी टाकतात. ह्या सीन मुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. अश्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. हिंदू धर्मात हवन कुंडला विशेष महत्त्व आहे आणि या चित्रपटातून त्याचा अपमान झाल्याचे समोर आले आहे.
View this post on Instagram
शिवसेना हिंदच्या युवा समितीचे अध्यक्ष इशांत शर्मा आणि पंजाब शिवसेना (टकसाली) चे अध्यक्ष सुनील कुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. लाखो हिंदूंच्या भावनेचा विचार न करता ह्या चित्रपटात हा सीन मांडला तो चुकीचा आहे अस म्हणत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
जालंदर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात कलम 295 अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली आहे. “ टीआरपी वाढवण्याचा प्रयत्नासाठी लोक हिंदू धर्माला टार्गेट करतात. हे दुसऱ्या जातीत घडले असते तर त्यांनी थिएटर उध्वस्त केले असते किंवा आग लावली असती. हिंदू धर्म हा अतिशय मवाळ धर्म आहे. म्हणूनच आम्ही प्रथम सरकारकडे मागणी घातली” वृत्तसंस्थेशी संवाद साधताना असे म्हणाले की, 24 तासांत कारवाई न झाल्यास ते दिग्दर्शक स्मीप कांग आणि गुरप्रीत घुग्गी यांच्या घराबाहेर आंदोलन करतील.