झोमॅटो कंपनीने ऑनलाइन फूड डिलिव्हरी जाहिरात महाकाल मंदिराच्या फूड प्लेटशी जोडल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. कंपनीची ही जाहिरात हृतिक रोशन अभिनेत्याने केली आहे, यामध्ये अभिनेता हृतिक रोशन म्हणतोय, "थाली का मन किया उज्जैन में हैं, तो महाकाल से मंगा लिया"। त्यावर महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी निषेध नोंदवला आहे. महाकाल मंदिरातून अशी कोणतीही थाळी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, अगदी उज्जैनमध्येही पोहोचवली जात नाही, असे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच ही जाहिरात हिंदूंच्या भावना दुखावणारी आहे त्यामुळे या जाहिरातीचा विरोध केला आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)