रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचे नाते गेल्या अनेक दिवसांपासून चर्चाचा विषय ठरत होते. अखेर आलिया कपूर कुटुंबाची सून झाली. 14 एप्रिल रोजी दोघांचे लग्न मुंबईत पार पडले. करोडो चाहत्यांनी रणबीर आणि आलियाला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. या अभिनंदनपत्रांमध्ये फूड डिलिव्हरी सेवा कंपनी झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) यांचीही नावे आहेत. या दोन्ही कंपन्यांनी हटके पद्धतीने दोघांचेही अभिनंदन केले आहे. Zomato आणि Swiggy च्या या स्टाइलला सोशल मीडियावर युजर्सनी पसंती दिली आहे.
रणबीर आणि आलियाला त्यांच्या लग्नाबद्दल शुभेच्छा देताना झोमॅटोने ट्विट केले की, 'अभिनंदन रणबीर आणि आलिया, स्टुडंट ऑफ द इयर आणि सेल्समन ऑफ द इयर या वर्षाच्या सुरुवातीपासून काही गरज असेल तर आम्हाला नक्की कळवा'. (हेही वाचा - First Look: अखेर Alia Bhatt आणि Ranbir Kapoor यांनी बांधली लग्नगाठ; समोर आले लग्नाचे खास फोटो (See Photos))
झोमॅटोने रणबीर आणि आलिया या दोघांच्याही चित्रपटांची नावे शुभेच्छामध्ये ठेवली आहेत. आलिया भट्टने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयरमधून आपल्या करिअरची सुरुवात केली, तर सेल्समन ऑफ द इयरमध्ये रणबीर कपूरने अभिनयाने लोकांची मने जिंकली.
congratulations alia and ranbir, let us know if student of the year and salesman of the year need anything from the start-up of the year ❤️
— zomato (@zomato) April 14, 2022
स्विगी ट्विट -
congratulations to ranbir and alia on settling for dal chawal for 50 years and more ❤️
— Swiggy (@swiggy_in) April 14, 2022
दुसरीकडे स्विगीनेही रणबीर आणि आलिया भट्टचे वेगळ्या पद्धतीने अभिनंदन केले. रणबीरच्या 'ये जवानी है दिवानी' मधील डायलॉगने प्रेरित होऊन स्विगीने ट्विटमध्ये लिहिले, '50 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ डाळ-भात मध्ये सेटल होण्यासाठी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे अभिनंदन.'