First Look: अखेर Alia Bhatt आणि Ranbir Kapoor यांनी बांधली लग्नगाठ; समोर आले लग्नाचे खास फोटो (See Photos)
Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding (Photo Credit : Instagram)

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आता पती-पत्नी (Alia Bhatt and Ranbir Kapoor's Wedding) झाले आहेत. आज दुपारी, 14 एप्रिल 2022 रोजी दोघांचे लग्न पार पडले. या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होत्या, आता त्याला पूर्णविराम लागला. 13 एप्रिल रोजी दोघांचा मेहंदी सोहळा पार पडला आणि आज त्यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. कालपर्यंत हे लग्न कधी होणार आहे हेच माहित नव्हते. लग्नाचा एकही फोटो लीक होऊ दिला नाही. परंतु आता लग्नानंतरचे मिस्टर आणि मिसेस कपूर यांचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

लग्नानंतर, आलिया भट्ट-कपूर आणि रणबीर कपूर ‘वास्तू’च्या टेरेसवर फोटोसाठी पोज देताना दिसले होते. यावेळी नवपरिणीत जोडपे रणबीर कपूर, आलिया भट्ट यांनी एकमेकांच्या हातात हात घालून, लग्नानंतरचे पहिले रॉकिंग फोटोशूट केले. सध्या या फोटोशूटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यासह आलिया भट्टनेही आपल्या सोशल मिडियावर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

रणबीर आणि आलिया यांनी रणबीरच्या पाली हिल येथील ‘वास्तू’ या निवासस्थानी पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्न केले. नीतू कपूर, रिद्धिमा कपूर साहनी, सोनी राजदान, शाहीन भट्ट, महेश भट्ट, पूजा भट्ट, करीना कपूर खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर, करण जोहर, नव्या नवेली नंदा आणि आकाश अंबानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी लग्नाला हजेरी लावली होती. बुधवारी दोघांनी प्री-वेडिंग सेरेमनी केली. रणबीरने त्याच्या पाली हिल येथील वास्तू येथे मेहंदी आणि हळदी समारंभाचे आयोजन केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर मुलगा रणबीर कपूरच्या लग्नाला उपस्थित नसले तरी लग्नादरम्यान त्यांचा फोटो खास ठिकाणी ठेवण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा फोटो फुलांनी सजवण्यात आला होता.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नानंतर लग्न समारंभाचे फोटो समोर येऊ लागले आहेत. याआधी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये करीना कपूर, करिश्मा कपूर आणि करण जोहर दिसत आहेत. करीना आणि करिश्मा साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. त्यानंतर संध्याकाळी साधारण 7,30 वाजता रणबीर आणि आलिया एकत्र मिडियासमोर आले होते.