आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याने Zareen Khan ची एक्स मॅनेजरविरुद्ध पोलिसात तक्रार
झरीन खान (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan) हिने एक्स मॅनेजरवर अंजली अथ (Anjali Atha) विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अंजलीने अपशब्द वापरले असल्याचा आरोप झरीनने केला आहे. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी खार पोलिस स्टेशनमध्ये झरीन खानने एफआयआर (FIR) दाखल केली. आयपीसीच्या कमल 509 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामावरुन काढून टाकल्यानंतरही अंजली अथ यांनी झरीन यांना आक्षेपार्ह मेसेज पाठवले होते.

रिपोर्ट्सनुसार, अंजली यांनी झरीनसोबत 3-4 महिने काम केले होते आणि त्यानंतर दोघींमध्ये पैशावरुन वाद निर्माण झाले. त्यानंतर दोघींचा मेसेजवरुन संवाद झाला. त्यात एका मेसेजमध्ये अंजलीने झरीनसाठी अपशब्द वापरले. असे जरी असले तरी झरीनजवळ सध्या चांगले प्रॉजेक्ट्स नसल्याने ती अंजलीचे मानधन देऊ शकत नाही, अशीही चर्चा सुरु आहे.

'वीर' सिनेमातून झरीनने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. या सिनेमात सलमान खानसोबत तिने काम केले होते. त्यानंतर 'हेट स्टोरी 3,' 'हाऊसफुल 2,' '1921' आणि 'अक्सर 2' यांसारख्या सिनेमात झरीन झळकली होती.