Year Ender 2019: बॉलीवूड मधील 'ही' Top 5 गाणी तुम्ही ऐकली आहेत का?
Bollywood Songs (Photo Credits: Twitter)

Top 5 Bollywood Songs: 2019 हे वर्ष हे कधी डिसेंबर महिन्यावर येऊन पोहोचलं हे कळलंच नाही. वर्षभरात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट विशेष कामगिरी करत सिल्वर स्क्रीनवर चमकले. गल्ली बॉय, कबीर सिंग, दबंग आणि त्यासारख्या चित्रपटांसह 2019 हे नक्कीच एक मनोरंजक वर्ष ठरले. मनोरंजक चित्रपटांच्या व्यतिरिक्त, या वर्षामध्ये अनेक हिट गाणी देखील प्रेक्षकांना ऐकायला मिळाली. चला तर पाहूया या वर्षात कोणती गाणी ठरली आहे म्युझिक प्रेमींसाठी टॉप 5 गाणी.

बेखयाली

चित्रपटामध्ये अनेक सुंदर ट्रॅक आहेत जे यादीमध्ये नक्कीच स्थान मिळवू शकतात. परंतु, 'बेखयाली' हे गाणं एका प्रियकराच्या तुटलेल्या प्रेमकहाणीवर भाष्य करते. ज्यांचे हृदय तुटले आहे असा प्रत्येक जण या गाण्याशी रिलेट करू शकतो.

अपना टाइम आयेगा

ऑस्कर मध्ये प्रवेश केलेल्या या चित्रपटाची गाणी ही आपल्या देशातील स्ट्रीट रॅपरची कथा सांगतात. 'अपना टाइम आयेगा' या गाण्याला अनोळखी कलाकारांना आवाज दिला गेला आहे. आणि विशेष म्हणजे रणवीर पाठोपाठ प्रत्येक जण आपसूकच हे गाणं ऐकल्यावर रॅप करू लागतं अशी या गाण्याची जादू आहे.

कोका कोला

कार्तिक आर्यन आणि कृती सॅनॉन यांच्या सॅसी डान्स मूव्हसह 'कोका कोला' हे गाणे 2019 चे पार्टीसाठी अगदी परफेक्ट सॉंग ठरले. नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

मखना

जॅकलिन फर्नांडिज आणि सुशांतसिंग राजपूत हे दोघं लीड रोलमध्ये असणाऱ्या 'ड्राइव्ह' या चित्रपटातील पॉप्युलर गाणं 'मखना' इतर कोणत्याही ट्रॅकप्रमाणेच आपल्याला रिफ्रेश करतं. हे गाणं पाहिल्यावर तुम्हालाही लगेचच तुमची बॅग पॅक करून गोवा ट्रिपला जायची इच्छा होईल. हा चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर कमल करू शकला नसला तरी त्यातील ट्रॅक नक्कीच पॉप्युलर ठरला.

Year Ender 2019: बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केलेले बॉलिवूडचे Top 10 चित्रपट, येथे पाहा यादी

ओ साकी साकी रे

पडद्यावर 'ओ साकी साकी रे' या गाण्यात नोरा फतेही हिचे किलर मूव्हस पाहताना तुम्ही दुसरीकडे पाहूच शकत नाही. 2011 मध्येया गाण्याचं ओरिजनल व्हर्जन प्रदर्शित झालं होतं, जे हिट ठरलेच पण त्याहूनही जास्त या गाण्याची जादू काही औरच आहे.