Rupali Barua Marry With Ashish Vidyarthi: खरं तर 60 व्या वर्षी लोकं निवृत्त होतात. उरलेला वृद्धापकाळ नातवंडं आणि आपल्या आवडत्या छंदासाठी व्यतीत करतात. पण, अभिनेता आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) याला अपवाद ठरले आहेत. नुकतीच त्यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि 25 मे 2023 रोजी तशी जाहीर घोषणाही केली. विशेष म्हणजे आशिष विद्यार्थी यांचा हा दुसरा विवाह आहे. सहाजिकच सोशल मीडियावर आशिष विद्यार्थी यांच्यापेक्षा रुपाली बरुआ (Who is Rupali Barua) यांचीच अधिक चर्चा आहे. सर्वांना प्रश्न पडला आहे, रुपाली बरुआ आहेत तरी कोण? (Who is Ashish Vidyarthi New Wife) ज्यांनी केलंय आशिष विद्यार्थी यांच्याशी विवाह.
आशिष विद्यार्थी यांचा हा विवाह अनेकांना समजून घेताना काहीसे गुंतागुंतीचे प्रकरण वाटू शकतो. होय, आशीष विद्यार्थी यांचा यापूर्वी एक विवाह झाला आहे. त्या विवाहापासून विद्यार्थी यांना एक मुलगाही आहे. ज्याचे नाव अर्थ विद्यार्थी असे आहे. आशिष यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पीलू विद्यार्थी असे होते. पण पीलू यांचे लग्नापूर्वीचे नाव राजोशी बरुआ असे होते. आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या पत्नी राहिलेल्या राजोशी बरुआ या एक अभिनेती आणि गायिकाही आहेत. आणखी एक आठवण अशी की राजोशी बरुआ या दिवंगत अभिनेत्री शकुंतला बरुआ यांच्या कन्या आहेत. (हेही वाचा, Ashish Vidyarthi Marries Rupali Barua: अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी 60 व्या वर्षी बांधली रुपाली बरुआशी लग्नगाठ)
कोण आहेत रुपाली बरुआ?
विविध मीडिया पोर्टल्सनी विविध वृत्तांचा दाखलादेत दिलेल्या वृत्तानुसार, पाली बरुआ मूळच्या गुवाहाटीच्या आहेत. त्या कोलकाता येथे एक फॅशन स्टोअर सालवतात. शिवाय त्या फॅशन उद्योजिकाही आहेत. कोलकाता येथील अपस्केल फॅशन स्टोअरशीसुद्धा त्यांचे नाव जोडले जाते.
ट्विट
Senior actor Ashish Vidyarthi has tied the knot with Fashion entrepreneur Rupali Barua in an intimate ceremony today! pic.twitter.com/n1eP9RNCz9
— AndhraBoxOffice.Com (@AndhraBoxOffice) May 25, 2023
आशिष विद्यार्थी अल्पपरीचय
आशिष विद्यार्थी हा एक दिग्गज अभिनेता आहे ज्याने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि इतरही काही प्रादेशिक भाषांमध्ये असंख्य चित्रपट केले आहेत. 1942: अ लव्ह स्टोरी, बाजी, जीत, मृत्युदाता, अर्जुन पंडित, मेजर साब, सोल्जर, हसिना मान जायेगी, जानवर, वास्तव: द रिअॅलिटी, जोरू का गुलाम, शरणार्थी, जोडी नंबर 1 आणि क्योंकी हे काही त्यांचे गाजलेले आणि प्रेक्षांची अधिक पसंती मिळालेले चित्रपट आहेत.