Ashish Vidyarthi Marries Rupali Barua: अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी 60 व्या वर्षी बांधली रुपाली बरुआशी लग्नगाठ

आशिषच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह 11 भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Ashish Vidyarthi Marries Rupali Barua: अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी 60 व्या वर्षी बांधली रुपाली बरुआशी लग्नगाठ
Ashish Vidyarthi

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव, एक दिग्गज अभिनेते आशिष विद्यार्थी पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी दुसरे लग्न केले आहे. आशिष यांनी आसामच्या रुपाली बरुआसोबत लग्नगाठ बांधली आहे. काही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी कोर्ट मॅरेज केल्याचे बोलले जात आहे. रुपाली फॅशनच्या व्यवसायाशी निगडीत आहे. रुपाली बरुआ या आसाममधील गुवाहाटी येथील रहिवासी आहेत. त्यांचे कोलकात्यात फॅशन स्टोअर आणि स्वतःचा व्यवसाय आहे. आशिषच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह 11 भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (हेही वाचा: Soha Ali Khan Wishes Hubby Kunal Kemmu: सोहा अली खानने पती कुणाल खेमूच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला मोहक व्हिडिओ)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 25, 2023 08:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).