Vidya Balan: 'भूल भुलैया 2' मध्ये विद्या बालन पुन्हा मंजुलिकाची भूमिका साकारणार, दिग्दर्शक अनीस बज्मी यांची माहिती
Vidya Balan (Photo Credit - Youtoub)

विद्या बालनने (Vidya Balan) तिच्या कारकिर्दीत अशा काही व्यक्तिरेखा साकारल्या आहेत ज्या आजही स्मरणात आहेत. 2007 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'भूल भुलैया' (Bhool Bhulaiyaa) या चित्रपटात विद्या बालनने मंजुलिकाची भूमिका साकरली होती. विद्याने या व्यक्तिरेखेत भरपुर मेहनत घेतली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले. एक प्रकारे ही तीची सर्वोत्तम कामगिरी आहे. आता या आयकॉनिक भूमिकेतून विद्या बालन 'भूल भुलैया 2' मध्ये पुनरागमन करणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत सर्व काही निश्चित असल्याची पुष्टी ‘द मिड डे’च्या वृत्तात करण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी सांगितले की मंजुलिका ही त्यांची आवडती व्यक्तिरेखा आहे आणि जर चित्रपट भूल भुलैया असेल तर ती नक्कीच भूल भुलैया 2 मध्ये दिसणार आहे.

विद्याने 'परिणिता' या कल्ट रोमँटिक चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ज्यामध्ये तिच्यासोबत संजय दत्त आणि सैफ अली खानसारखे कलाकार होते. त्या चित्रपटानंतर विद्याच्या करिअरला तेजी आली आणि तिने अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या, त्यापैकी एक म्हणजे 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर 'शेरनी' या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. (हे ही वाचा Chakda Xpress: अनुष्का शर्मा 3 वर्षानंतर करणार बाॅलिवुड मध्ये कमबैक, महिला किक्रेटेर झुलन गोस्वामीच्या दिसणार भुमिकेत)

सिक्वेलमध्ये अक्षयच्या जागी कार्तिक आर्यन

'भूल भुलैया 2' या चित्रपटात अक्षय कुमारच्या जागी कार्तिक आर्यन दिसणार आहे. यात कार्तिकसोबत कियारा अडवाणी आणि तब्बू देखील दिसणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारने जो लूक केला होता त्याच लूक मध्ये कार्तिकही दिसणार आहे. अक्षय कुमारचा 'भूल भुलैया' 2007 मध्ये रिलीज झाला प्रेक्षकांकडून चित्रपटाला खुप प्रेम मिळाले, हा चित्रपट त्या वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक होता. अक्षयसोबत या चित्रपटात परेश रावल, अमिषा पटेल आणि राजपाल यादव होते.