Deepika-Ranveer New House: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या मुंबईतील नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल; 'इतकी' आहे किंमत
Deepika Padukone and Ranveer Singh (PC - Facebook)

Deepika-Ranveer New House: बॉलिवूड कपल दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी, या जोडप्याने अलिबाग येथे नवीन खरेदी केलेल्या घरात गृहप्रवेश पूजा आयोजित केली होती. आता दोघेही लवकरच त्यांच्या मुंबई क्वाड्रप्लेक्समध्ये शिफ्ट होऊ शकतात, जे सध्या निर्माणाधीन आहे. त्यामुळे दीपिका आणि रणवीरला त्यांच्या आलिशान सी-फेसिंग घरात शिफ्ट होण्यासाठी थोडे दिवस थांबावे लागणार आहे.

पापाराझी वरिंदर चावलाने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, ही एक उंच आणि भव्य इमारत आहे, जी नागपाल डेव्हलपर्स बांधत आहे. इमारतीच्या बाहेरील एका स्क्रीन बांधकाम पूर्ण झाल्यावर ही इमारत कशी दिसेल हे दाखवण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी इमारत शाहरुख खानच्या मन्नतच्या जवळ आहे. तसेच ते सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्याही जवळ आहे. (हेही वाचा - Alia Bhatt Daughter Name: आलिया भट्ट-रणबीर कपूर ने आपल्या मुलीचं ठेवलं 'हे' नाव: अभिनेत्रीने पोस्ट शेअर सांगितला नावाचा अर्थ)

यापूर्वी पीटीआयने रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने बँडस्टँडमधील सागर रेशम या इमारतीत 16, 17, 18 आणि 19 मजल्यांमध्ये अपार्टमेंट खरेदी केल्याचे वृत्त दिले होते. त्याची किंमत 119 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, रणवीर आणि दीपिका जवळपास तीन वर्षांपासून मुंबईतील जुहू आणि वांद्रे येथे घर शोधत होते. त्याने शेवटी सागर रेशमची निवड केली. त्यांच्या या नवीन निर्माणाधीन अपार्टमेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

ऑगस्टमध्ये, रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या घरातील गृह प्रवेश पूजेचे फोटो शेअर केले होते, जे इंटरनेटवर व्हायरल झाले होते. फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिका हवन करताना दिसले. त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (हेही वाचा - Richa Chadha Galwan Tweet Controversy: अभिनेत्री रिचा चढ्ढाच्या एका ट्विटने राजकीय वातावरण तापलं, शिवसेनेसह भाजपचा अभिनेत्रीवर हल्लाबोल)

या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, दीपिका पदुकोण तिच्या सेल्फ केअर ब्रँड 82E मध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे, रणवीर सिंग त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'सर्कस' चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.