Richa Chadha Galwan Tweet Controversy: अभिनेत्री रिचा चढ्ढाच्या एका ट्विटने राजकीय वातावरण तापलं, शिवसेनेसह भाजपचा अभिनेत्रीवर हल्लाबोल
PC:- richa chaddha Facebook

भारतीय सेना पाकव्याप्त काश्मिरमध्ये ऑपरेशनसाठी पुर्णपणे सज्ज असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदींनी दिली होती. तरी या वर अभिनेत्री रिचा चढ्ढीने हाय गलवान अशा आशयाचं ट्विट केलं होतं. संबंधित ट्विट करत रिचा चढ्ढाने भारतीय सेनेची थट्टा केल्याचा आरोप रिचा चढ्ढावर होत आहे. तरी नेटकऱ्यासह राजकीय नेते देखील रेचा चढ्ढावर चांगलेचं संतापले असुन रिचा चढ्ढाला सोशल मिडीयावर ट्रोल केलं जात आहे. संबंधीत प्रकारवर आपलं आक्षेपार्ह ट्विट डिलीट करत माफी मागितली आहे. रिचाने एक इमेज शेअर केली आहे ज्यात तिने लिहलयं, माझ्या ट्विटमुळे कुणी दुखावलं गेलं असल्यास मी माफी मागते. ही माझ्यासाठी अत्यंत दुखद बाब आहे की नकळत माझ्या एका ट्विटमुळे माझे फौजी बंधु दुखावल्या गेलेत. माझे आजोबा देखील भारतीय लष्करात होते, भारत-चीन युध्दात त्यांच्या पायवर गोळी लागलेली,त्यांचं देशासाठीचं बलिदान मी अनुभवलं आहे. माझे मामा देखील भारतीय लष्करात होते त्यामुळे भारतीय सेनेविषयी आदर,प्रेम कायम माझ्या रक्तात आहे. अशा आशयाचं ट्विट करत रिचा चढ्ढाने माफी मागितली आहे.

 

तरी विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून रिचा चढ्ढावर चांगलाचं हल्लाबोल केल्या जात आहे. उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी अभिनेत्री रिचा चढ्ढावर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच या प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्यांवर बंदी आणण्याची मागणी देखील शिवम दुबेंनी केली आहे. (हे ही वाचा:- Priyanka Chopra: देसी गर्ल प्रियंका चोप्राने पहिल्यांदाच शेअर केला आपल्या लेकीचा फोटो, नेटकरी म्हणाले ही तर निकची झेरॉक्स कॉपी)

राज्यातील सत्ता स्थापनेनंतर उध्दव ठाकरे गटाशी सहमत होत पहिल्य़ादाचं भाजपने देखील आपली प्रतिक्रीया दिली आहे. भाजप प्रवक्ते राम कदम यांनी देखील रिचा चढ्ढाच्या जाहीर माफीची मागणी केली होती. तरी रिचा चढ्ढाने प्रकरण चिघण्या आधीच माफी मागितल्याने वाद निवळला असं म्हणता येईल. हल्ली कोण कुणाच्या कुठल्या वक्तव्यावर काय आक्षेप घेईल ह्याचा जराही नेम उरलेला नाही. तरी अभिनेत्री रिचा चढ्ढा मात्र आज देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.