ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (Arun Bali) यांचे शुक्रवारी (7 ऑक्टोबर) सकाळी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. टीव्ही शो स्वाभिमान आणि ब्लॉकबस्टर हिट 3 इडियट्समधील कामासाठी ते विशेष प्रसिद्ध होते. बाली यांचा मुलगा अंकुशने सांगितले की, त्यांचे वडील मायस्थेनिया ग्रॅव्हिसने (Myasthenia Gravis) त्रस्त होते. हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. जो नसा आणि स्नायू यांच्यातील संबंधाच्या बिघाडामुळे होतो. त्यांना या वर्षाच्या सुरुवातीलाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अंकुश म्हणाले की त्याचे वडील उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते परंतु पहाटे 4.30 च्या सुमारास त्यांचे निधन झाले.
पीटीआयशी बोलताना अंकुश बाली म्हणाले की, माझे वडील (अरुण बाली) आम्हाला सोडून गेले. त्यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिसचा त्रास होता. दोन-तीन दिवसांपासून त्यांची मनःस्थिती बदलली होती. त्यांनी केअरटेकरला सांगितले की त्यांना वॉशरूमला जायचे आहे. बाहेर आल्यावर त्यांनी सांगितले की मला बसायचे आहे. त्यानंतर त्यांचे प्राणच गेले. (हेही वाचा, Sara Lee Passes Away: माजी WWE 'टफ इनफ' विजेती सारा ली हिचे निधन, वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी अखेरचा श्वास)
सुपरस्टार शाहरुख खानचा काका म्हणून प्रख्यात असलेले चित्रपट निर्माता लेख टंडन यांचा टीव्ही शो 'दूसरा केवल'मधून बाली यांनी अभिनयात पदार्पण केले. पुढे त्यांनी चाणक्य, स्वाभिमान, देस में निकला होगा चांद, कुमकुम - एक प्यारा सा बंधन, आणि यांसारख्याअनेक टीव्ही शोमध्ये काम केले.
ट्विट
Veteran actor Arun Bali passes away at the age of 79 years in Mumbai
— ANI (@ANI) October 7, 2022
अरुण बाली यांनी अनेक चित्रपटांत भूमिका केल्या. यात सौगंध, राजू बन गया जेंटलमन, खलनायक, सत्य, हे राम, लगे रहो मुन्ना भाई, 3 इडियट्स, रेडी, बर्फी, मनमर्जियां, केदारनाथ, सम्राट पृथ्वीराज आणि लाल सिंग चड्ढा यांसारख्या काही लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे.
त्याचा शेवटचा चित्रपट गुडबाय शुक्रवारी प्रदर्शित झाला. ज्यात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना देखील आहेत. बाली यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.