वरुण धवन (Photo Credits: Yogen Shah)

Varun Dhawan Car Accident: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आज नताशा दलाल (Natasha Dalal) सोबत लग्नगाठ बांधणार आहे. परंतु, त्याआधी त्याच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वरुणच्या कारला शनिवारी रात्री अपघात झाला. मात्र, या अपघातातून तो वाचला आहे. वरुण आज त्याची मैत्रीण नताशा दलालशी लग्न करणार आहे. लग्नासाठी तो मुंबईहून अलिबागला जात होता, त्यावेळी हा अपघात झाला.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, वरुणचे कुटुंब आणि मित्र लग्नाचा विधी करण्यासाठी अलीबागमध्ये पोहोचले आहेत. शुक्रवारी कामात व्यस्त राहिल्यामुळे शनिवारी तो आपल्या कारमध्ये मुंबईहून अलिबागकडे (Mumbai to Alibaug) निघाला. मुंबई ते अलिबाग असा 4 तासांचा प्रवास त्याला लवकरात-लवकर पूर्ण करायचा होता. मात्र, जुहू ते अलिबागच्या वाटेवर त्यांच्या कारचा अपघात झाला. परंतु, सुदैवाने अभिनेता आणि ड्रायव्हरला दुखापत झाली नाही. (वाचा - Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: नताशा दलाल कोण आहे? जिच्याशी वरुण धवन घेणार आहे सात फेरे)

वरुण धवन (Photo Credits: Yogen Shah)

सुट्टी दरम्यान अलिबागच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते. परंतु, वरुणला लवकरचं लग्नाच्या ठिकाणी पोहचायचे होते. यावेळी त्यांच्या कारचा अपघात झाला. वरुणची आई लाली, वडील डेव्हिड धवन, भाऊ रोहित धवन, काका आणि मित्रांसह अलिबागमधील लग्नाच्या ठिकाणी पोहचला आहे. करण जोहर वरुणचा संगीत समारंभ आयोजित करणार आहे. ज्यात बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटी दिसणार आहेत.