Urvashi Rautela हिने ट्रायल रुममधील व्हिडिओ शेअर केल्याने युजर्सकडून संताप व्यक्त
Urvashi Rautela (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही नेहमीच सोशल मीडियात अॅक्टिव्ह असते. तर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकत्याच तिने एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये ती एका ट्रायल रुममध्ये दिसून येत आहे. त्याला एक कॅप्शन सुद्धा दिले आहे. मात्र तिच्या या व्हिडिओवरुन तिला आता युजर्सकडून ट्रोल्ससह संताप व्यक्त केला जात आहे.(Priyanka Chopra Jonas ने पती Nick Jonas सोबत समुद्रकिनारी मजा करतानाचा शेअर केला Bold आणि Sexy अंदाजातील फोटो! View Pic)

उर्वशी हिने व्हिडिओला कॅप्शन दिले की, Got a serious case of R.B.F. (Resting Breakfast Face) व्हिडिओच्या बॅकग्राउंडला स्पेंसचे ब्रेकफास्ट चॅलेंज सॉन्ग सुरु आहे. यामध्ये तिने एक आउटफिट घातला असून तो ट्राय करताना दिसून येत आहे.(Urvashi Rautela Workout Video: उर्वशी रौतेला हिच्या वर्कआउटची सोशल मीडियावर चर्चा, पाहा व्हिडिओ)

परंतु उर्वशी हिचा ट्रायल रुममधील व्हिडिओ युजर्सला आवडलेला नाही. त्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला काहींनी तिच्या या कॉन्फिडेंसची तारीफ केली आहे.

उर्वशी रौतेला अत्यंत फॅशनिस्ट आहे. ती नेहमीच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योग आणि वर्कआउट करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा ती शेअर करते. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच तेलगु इंडस्ट्री मध्ये डेब्यू करताना दिसून येणार आहे.