बॉलिवूडची स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर (Social Media) नेहमी सक्रीय असते. बॉलिवूडमध्ये कमी वेळेत मोठी प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये उर्वशीची गणना केली जाते. उर्वशी ही नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर करताना आपण पाहिले आहे. एवढेच नव्हेतर ती सोशल मीडियाद्वारे तिचे फिटनेस सिक्रेट्सदेखील उघड करत असते. उर्वशीने नुकताच तिचा वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
उर्वशीने इन्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने जिम आउटफिट्स परिधान केले आहे. यात ती जिम वर्कआऊट करताना दिसतात. या व्हिडिओला उर्वशीने '40 मिलियन लव्ह…माझ्या या वर्कआउट कॅप्शन द्या प्लीज', असे कॅप्शन दिले आहे. हे देखील वाचा- Kangana Ranaut हिच्या थलाइवी सिनेमाच्या विरोधात कटकारस्थान रचले जातेय? अभिनेत्रीने व्हिडिओ पोस्ट करत दिले स्पष्टीकरण
उर्वशी रौतेला यांची इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
व्हिडिओला अल्पावधीत 55 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अभिनेत्रीच्या या ताज्या व्हिडिओमध्ये तिची मेहनत पाहून लोक तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत आहेत. फिटनेस फ्रिक उर्वशी रौतेलाचे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कसरत करतानाचे असे अनेक व्हिडिओ आहेत. उर्वशी ही लवकरच 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सिरीजमध्ये रणदीप हुड्डा त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.