Kangana Ranaut हिच्या थलाइवी सिनेमाच्या विरोधात कटकारस्थान रचले जातेय? अभिनेत्रीने व्हिडिओ पोस्ट करत दिले स्पष्टीकरण
Kangana Ranaut | (Photo Credits-Twitter Video)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. प्रत्येक मुद्द्यावर ती उघडपणे भाष्य करते. मात्र काही वेळेस तिने केलेल्या विधानांवर टीका सुद्धा केली जाते. याच कारणामुळे सध्या कंगना हिला  फटका बसत आहे. कारण तिने आरोप लावला आहे की, काही मल्टिप्लेक्स काही कारण सांगून थलाइवी (Thalaivii) प्रदर्शित करत नाही आहेत. कंगना हिने याच संदर्भातील एक व्हिडिओ शेअर करत असे म्हटले की, या कठीण काळात आपल्याला एकमेकांना समर्थन दिले पाहिजे. ही वेळ सडेतोड उत्तर देण्यासाठी नाही आहे. आमचा सिनेमा थलाइवी 90 कोटी रुपयांच्या बजेटचा आहे. माझ्या प्रोड्युसरने हा निर्णय घेतला की, सिनेमा कोणत्याच स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणार नाही. पण सिनेमागृहात प्रदर्शित केला जाईल. कारण आम्हाला यामधून ओळख मिळाली आहे. अशातच आपल्याला एकमेकांची मदत करायची आहे. परंतु आता थिएटर्सकडूनच सपोर्ट मिळत नाही आहे. कारण मल्टिप्लेक्स कडून कारणे सांगितले जात आहेत.

कंगना हिने पुढे असे म्हटले की, आमचा सिनेना 3 भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे. हिंदी थिएटरकडे दोन आठवड्यांची विंडो आहे. तरीही ते काही ना काही कारण सांगत आहेत. तर साउथ सिनेमांमध्ये 4 आठवड्यांची विंडो आहे. परंतु मल्टीप्लेक्स आमचा सिनेमा प्रदर्शितच करत नाही आहे. मोठ्या मोठ्या प्रोडक्शन हाउसचा हवाला देत आणि त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट असल्याचे सांगत थलाइवी प्रदर्शित करत नाही आहेत. माझे त्यांना निवेदन आहे की, त्यांनी अशा प्रकाराला बळी पडू नये. ज्यामुळे सिंगल प्रोड्युसर संपुष्टात येतील. मल्टिप्लेक्सच्या मालकांनी आपल्या येथे प्रेक्षक येण्याच्या मुद्द्यावर विचार करायला हवा.(Payal Rohatgi: अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

कंगनाने अखेर सगळ्यांना विनवणी करत म्हटते की. माझा सिनेमा मल्टिप्लेक्स मध्ये प्रदर्शित न झाल्यास प्रेक्षकांना विनंती करते त्यांनी तो सिंगल स्क्रिनवर जाऊन पाहवा.