Tiger Shroff (Photo Credit: Instagram)

जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते' सिनेमातील 'दिलबर' गाणे चांगलेच गाजले. 'सिर्फ तुम' या सिनेमातील दिलबर गाण्यावर सुश्मिता सेनने आपला डान्स जलवा दाखवला होता. जॉनच्या सिनेमात गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन तयार करण्यात आले. या रिक्रिएटेड व्हर्जनवर नोरा फतेहीने धमाल डान्स केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर हे गाणे चांगलेच हिट झाले. त्यानंतर अनेक तरुण-तरुणी या गाण्यावर थिरकताना दिसले. आता अभिनेता टायगर श्रॉफही (Tiger Shroff) या गाण्यावर थिरकला आहे. टायगरची अॅक्शन आणि जबरदस्त डान्स मूव्ह्जची भूरळ अनेकांना पडते. पण टायगरला दिलबर गाण्यावर थिरकताना पाहणे, ही चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

पाहा टायगरचा दिलबर गाण्यावरील हटके डान्स....

 

 
 
 

View this post on Instagram

 
 

 

barrr #choreoby my main man @piyush_bhagat @swainvikram @shaziasamji

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

टायगरने हा डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताचा तो चांगलाच व्हायरल झाला आहे. टायगर श्रॉफ सध्या 'स्टुडंट ऑफ द ईअर 3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने 'बागी 3' सिनेमाची ही घोषणा केली.