साधारण 20 वर्षांपूर्वी 'सिर्फ तूम' चित्रपटातील दिलबर दिलबर गाणे चांगलेच लोकप्रिय झाले होते. या गाण्यावर थिरकलेली विश्वसुंदरी सुष्मिता सेन आजही अनेकांना आठवत असेल. त्यामुळे दिलबर दिलबर गाणे लागल्यावर सुष्मिताची आठवण नाही आली तरच नवल. पण, युट्युबवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या एक तरुण दिलबर दिलबर गाण्यावर डान्स करताना दिसतो आहे. गंमत अशी की या तरुणाचा डान्स पाहून प्रेक्षकांना चक्क सुष्मितालाही विसरायला होतं. कारण,या तरुणाचा डान्सच तितका लाजवाब आहे.
20 वर्षांपूर्वीच्या या गाण्याची जादू आजही कायम आहे. इतकी की, सन 2008मध्ये आलेल्या सत्यमेव जयते या चित्रपटात हे गाणे पुन्हा वापरण्या आले. मात्र, 2018मध्ये आलेल्या गाण्यात या गाण्यावर सुष्मिता सेन हिच्याऐवजी नोरा फतेही हिच्यावर होती. हिनेही या गाण्याला आपल्या ढंगात सादर करत सुष्मिताची उंची गाठण्याचा प्रयत्न केला. त्यात ती किती यशस्वी झाली हे सर्वांनाच माहिती आहे. (हेही वाचा, दारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल)
दरम्यान, आम्ही ज्या व्हिडिओबाबत सांगत आहोत तो व्हिडिओ एका लग्न समारंभातील असल्याचे समजते. लग्न समारंभात स्टेजवर नाचताना या तरुणाने कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. त्याचा डान्स पाहताना तुम्हालाही प्रश्न पडेल की, त्याच्या डान्समध्ये सुष्मिताची झलक दिसते की, नोरा फतेहीची?