दारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल
विमानात महिलेचा धिंगाणा (Photo Credit : Twitter)

दारु न दिल्यामुळे विमानात एका परदेशी महिलेने फार गोंधळ घातला. इतक्यावरच ती थांबली नाही तर तिने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळही केली. एअर इंडियाचे हे विमान मुंबईहून लंडनला निघाले होते. ही महिला बिझनेस क्लासमधून प्रवास करत होती.

माहितीनुसार, ही महिला आधीच मद्यधुंद अवस्थेत होती. विमानातील कर्मचाऱ्यांकडे तिने आणखी ड्रिंकची मागणी केली. मात्र कर्मचाऱ्यांनी दारु देण्यास नकार दिल्याने ती चांगलीच भडकली. कर्मचाऱ्यांना धमकी देत तिने शिवीगाळ केली.

संबंधित महिला ही आयर्लंडची रहिवासी असून ती रोहिंग्या मुस्लिमांच्या मानवधिकारासाठी लढत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अद्याप एअर इंडियाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसंच या महिलेची ओळखही सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

पाहा व्हिडिओ....

एअर इंडियाच्या विमान क्र. AI-131 मध्ये हा प्रकार घडला. 10 नोव्हेंबरला घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे.