Baaghi 3 Poster : Tiger Shroff ने Instagram वर शेअर केलं बागी 3 सिनेमाचं पहिलं पोस्टर
बागी 3 सिनेमाचं पहिलं पोस्टर (Photo Credits : Instagram)

Baaghi 3 Poster : अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या सुपरहीट 'बागी' सिनेमाचा तिसरा भाग लवकरच रसिकांसाठी घेऊन येणार आहे. आज टायगर श्रॉफने बागी 3 (Baaghi 3) ची घोषणा करताना त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून खास पोस्टर शेअर केलं आहे. टायगरने शेअर केलेल्या पोस्टरनुसार बागी 3 हा सिनेमा 6 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे.इंस्टाग्रामवर बागी 3 सिनेमाचं पोस्टर शेअर करताना दिग्दर्शक अहमद खान, साजिद नाडियाडवाला यांच्यासह सिनेमाच्या टीमचा भाग असलेल्या इतर कलाकारांनाही टॅग केलं आहे. सोबतच कॅप्शनमध्ये 'राऊंड 3 इज ऑन ... हे ( पोस्टर ) तुमच्यासाठी असे म्हणत सिनेमाच्या रिलिज डेटबद्दल त्याने खुलासा केला आहे.

बागी सिनेमाच्या पहिल्या भागामध्ये टायगर सोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकली होती, विनोदी कलाकार सुनील ग्रोवर देखील या सिनेमात खास भूमिकेत होता. बागी 2 सिनेमामध्ये टायगर सोबत अभिनेत्री दिशा पटानी झळकली. बॉक्सऑफिसवर या दोन्ही सिनेमांना तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सारेच बागी 3 सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. तिसर्‍या भागामध्ये टायगर सोबत कोण अभिनेत्री झळकणार आहे ? याबद्दल मात्र अजूनही कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

बागी सिनेमाचं दिग्दर्शन शब्बीर खान यांनी केलं होतं, त्यानंतर दुसरा भाग अहमद खान यांनी दिगदर्शित केला आहे. आता तिसरा भागदेखील अहमद खान दिग्दर्शित करणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.