कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. कोरोनामुळे सध्या सिनेमागृह बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे एकापाठोपाठो एक हिंदी चित्रपटांचे प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. अभिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांच्या गुलाबो सितोबो या चित्रपटाचा प्रीमियर अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दिवंगत सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) दिल बेचारा (Dil Bechara) चित्रपटाचा प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar) प्रदर्शित केला जाणार आहे, अशी माहिती समोर आली होती. सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा हा अखेरचा चित्रपट आहे. यामुळे हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याऐवजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करावा, अशी मागणी चाहत्यांनी उचलून धरली होती.
दिल बेचारा हा चित्रपट 8 मे रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळे तो पुढे ढकलला गेला. त्यानंतर सुशांतने 14 जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतचा अखेरचा चित्रपट म्हणून त्याच्या चाहत्यांसाठी हा भावनिक आणि तितकाच उत्सुकतेचा क्षण आहे. ‘दिल बेचारा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सुशांतसिंह, संजना संघी, सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला मुकेश छाब्रा दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रीमियर 24 जुलै 2020 रोजी सांयकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी प्रदर्शित होणार आहे. महत्वाचे म्हणजे, या चित्रपटाचा प्रिमीअर डिस्ने प्लस हॉटस्टार’या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत पाहता येणार आहे. हे देखील वाचा- Dil Bechara टीम कडून सुशांत सिंह राजपूत याला सांगितिक श्रद्धांजली; ए.आर. रहमान, अरिजीत सिंह, श्रेया घोषाल यांच्यासह प्रसिद्ध गायकांच्या आवाजातील गाणे रिलीज (Watch Video)
ट्विट-
ANNOUNCEMENT... #DilBechara to premiere on #DisneyPlusHotstar...
On: 24 July 2020 [Friday]
At: 7.30 pm IST
FREE for subscribers *and* non-subscribers. pic.twitter.com/L98uGkqP0J
— taran adarsh (@taran_adarsh) July 22, 2020
जॉन ग्रीनच्या 2012 मधील बेस्टसेलर ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’वर आधारित 2014 मध्ये प्रदर्शित त्याच नावाने आलेल्या हॉलिवूडपटाचा हा अधिकृत रिमेक आहे. विशेष म्हणजे, डिस्ने प्लस हॉटस्टारने सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली म्हणून हा चित्रपट सर्व सब्सक्राइबर्स आणि नॉन- सब्सक्राइबर्ससाठी मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता.