Dil Bechara टीम कडून सुशांत सिंह राजपूत याला सांगितिक श्रद्धांजली; ए.आर. रहमान, अरिजीत सिंह, श्रेया घोषाल यांच्यासह प्रसिद्ध गायकांच्या आवाजातील गाणे रिलीज (Watch Video)
Musical Tribute to Sushant Singh Rajput (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' (Dil Bechara) 24 जुलै रोजी ऑनलाईन रिलीज करण्यात येणार आहे. सिनेमा प्रदर्शनापूर्वी बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांनी सुशातंला सांगितिक श्रद्धांजली वाहिली आहे. दिल बेचारा सिनेमाच्या टिमने विविध गायकांनी गायलेले गाणे प्रदर्शित करत सुशांतच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत. सोनी म्युझिक इंडियाने (Sony Music India) हे गाणे युट्युबवर (Youtube) रिलीज केले आहे. ए.आर. रहमान (A.R. Rahman) यांच्यासह श्रेया घोषाल (Shreya Ghoshal), सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan), अमिताभ भट्टाचार्य (Amitabh Bhattacharya), मोहित चौहान (Mohit Chauhan), अरिजीत सिंह (Arijit Singh), हृदय गट्टानी (Hriday Gattani) आणि जोनिता गांधी (Jonita Gandhi) यांच्या आवाजात हे गाणे ऐकायला मिळत आहे.

ए.आर. रहमान यांनी ट्विट करत या खास गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, "सुशांत सिंह राजपूत यांच्या प्रेमळ आठवणीत." (सुशांत सिंह राजपूत याची बहिण श्वेता सिंह राजपूत हिने भावाच्या आठवणीत शेअर केला भावूक व्हिडिओ, Watch Video)

A.R.Rahman Tweet:

'दिल बेचारा' सिनेमाच्या म्युझिक अल्बममध्ये विविध गाणी गाऊन सुशांतच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. तसंच गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी देखील दिल बेचारा या कवितेचे वाचन या म्युझिक अल्बममध्ये केले आहे. हा संपूर्ण अल्बम तुम्हाला देखील भावूक करेल.

पहा व्हिडिओ:

सुशांतच्या दिल बेचारा या अखेरच्या सिनेमाचे दिग्दर्शन मुकेश छाबड़ा यांनी केले आहे. या सिनेमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तर सुशांतसह सिनेमात झळकलेली अभिनेत्री संजना संघी हिचा देखील हा पहिला सिनेमा आहे.