Thalaivii: तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी अभिनेत्री जयललिता (Jayalalithaa) यांच्या आयुष्यावर आधारित कंगना रनौत (Kanana Ranaut) हिचा 'थलाइवी' हा सिनेमा येत्या 10 सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. थलाइवी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कंगनाने सोमवारी आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर थलाइवी सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे.(Tiger 3 च्या सेटवरुन Salman Khan चा नवा लूक समोर; पहा Photos)
कंगना हिने असे लिहिले आहे की, या प्रतिष्ठित व्यक्तीची कथा फक्त मोठ्या पडद्यावर पाहण्याजोगी आहे. हॅशटॅग थलाइवी साठी मार्ग मोकळा करावा. तर सिनेमाच्या दुनियेत एक सुपरस्टार एन्ट्री करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. थलाइवी येत्या 10 सप्टेंबरला सिनेमागृहात पाहता येणार आहे.
View this post on Instagram
निर्माते विष्णू वर्धन इंदूरी यांनी असे म्हटले की, थलाइवी ने प्रत्येक वळणावर जीवंत अनुभवांसह एक व्यापक प्रवासाचा मार्ग शोधला आहे. जसे की, देशभरात पुन्हा एकदा सिनेमागृह सुरु झाले असून आपण खुप उत्साही आहोत. प्रेक्षक सिल्वर स्क्रिनवर महान व्यक्तीच्या आयुष्याचा अनुभव घेऊ शकतात.
इंदुरी यांनी असे म्हटले की, जयललिता नेहमीच सिनेमाशी जोडल्या गेल्या होत्या. त्यांची कथा मोठ्या पडद्यावर जीवंत करणे हे एका क्रांतिकारी नेत्याला श्रद्धांजली देण्यासारखे होते.(Riteish-Genelia Crazy Videos: रितेश आणि जेनेलिया चे हे भन्नाट आणि मजेदार व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का? Watch Video)
दिवंगत जयललीता यांच्या आयुष्यावर आधारित थलाइवी त्यांच्या जीवनातील विविध पैलूंचे दर्शन घडवतात. एका लहान वयातच अभिनेत्रीच्या रुपात सुरु झालेला प्रवास तमिळ सिनेमांचा चेहरा बनला. त्याचसोबत तमिळनाडूच्या राजकरणात क्रांतिकारी नेत्याच्या उदयाने त्यांचे आयुष्यच पालटले गेले. तर गोथिक एंटरटेनमेंट आणि स्प्रिंट फिल्म यांच्या सहाय्याने विब्री मोशन पिक्चर्स, कर्मा मीडिया एंटरटेनमेंट आणि झी स्टुडिओ द्वारे प्रस्तुत थलाइवी, विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर द्वारे निर्मिती करण्यात आली आहे. तर हितेश ठक्कर आणि थिरुमल रेड्डी द्वारे बृंदा प्रसाद हे सह-निर्माते आहेत.