Tiger 3 च्या सेटवरुन Salman Khan चा नवा लूक समोर; पहा Photos
Salman Khan (Image Credits: Instagram)

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) सध्या नवा सिनेमा 'टायगर 3' (Tiger 3) च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासाठी अलिकडेच सलमान खान रशियाला रवाना झाला. त्याच्यासोबत त्याची को-स्टार कतरिना कैफ (Katrina Kaif) देखील उपस्थित होती. एअरपोर्टवरील त्यांचे फोटोज चांगलेच व्हायरल झाले होते. आता टायगर 3 च्या सेटवरुन सलमान खानचे काही फोटोज समोर आले आहेत. त्यात सलमान खानला ओळखणे देखील कठीण होत आहे. सोशल मीडियावर हे फोटोज तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोत सलमान खान मोठ्या दाढी-मिशांमध्ये दिसत आहे. सलमानने डेनिम शर्ट परिधान केला असून यात तो अगदी रशियन दिसत आहे. या फोटोमुळे चाहत्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढत आहे.

टायगर 3 सिनेमासाठी सलमान खानने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. पहा सेटवरील सलमान खानचे खास फोटोज... (Salman Khan Viral Video: Tiger 3 च्या शुटींगसाठी जात असताना विमानतळावर CISF अधिकाऱ्याने सलमान खानला थांबवले अन्...)

पहा फोटोज:

दरम्यान, टायगर 3 मध्ये सलमान आणि कतरिना यांच्या शिवाय इमरान हाशमी देखील प्रमुख भूमिकेत असणार आहे. यात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान सोबत इमरान हाशमी पहिल्यांदाच काम करत असून या भूमिकेसाठी त्याने जिममध्ये प्रचंड घाम गाळला आहे.

सलमान खान आणि  कतरिना कैफ यांच्या एक था टायगर या सुपरहिट फ्रँचायजीचा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी आलेले दोन सिनेमांनी देखील बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सिनेमाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. या सिनेमाचे शूटिंग रशिया, टर्की, युरोप या देशात होणार असून तब्बल 40 दिवसांचे शेड्युल आहे. त्यानंतर सलमान मुंबईत परतेल आणि बिग बॉस 15 च्या शूटिंगला सुरुवात करेल.