Tanhaji The Unsung Warrior New Poster: 'तानाजी द अनसंग वॉरियर' सिनेमातील सैफ अली खान आणि अजय देवगण यांचे लूक आले रसिकांसमोर
Ajay Devgn in Tanhaji The Unsung Warrior (Photo Credits: Twitter)

Saif Ali Khan and Ajay Devagan's Look From Tanhaji:  मराठी सिनेमांप्रमाणेच हिंदीमध्येही ऐतिहासिक आणि चरित्रात्मक सिनेमे रसिकांसाठी खास पर्वणी असते. नुकताच अजय देवगणची (Ajay Devgan) प्रमुख भूमिका असलेल्या 'तानाजी द अनसंग वॉरियर' (Tanhaji The Unsung Warrior) या सिनेमातील खास लूक शेअर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तानाजी यांच्या जीवनावर आधारित या सिनेमामध्ये अजय देवगण 'तानाजी मालुसरे' (Tanaji Malusare) यांची भूमिका साकारणार आहे. बॉलिवूडमधील बहूप्रतिक्षित सिनेमांपैकी हा एक आहे. या सिनेमांमध्ये सैफ अली खान (Saif Ali Khan) , काजोल मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित 'तानाजी: द अनसंग वॉरियर' या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या मुहूर्ताचे क्षण रसिकांसोबत शेअर करण्यात आले आहेत. या सिनेमात सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मराठमोळा अभिनेता अजिंक्य देवही या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अजय देवगण

'गड आला पण सिंह गेला', अशा शब्दांत तानाजी मालुसरे यांच्या धैर्याचं, शौर्याचं कौतुक करण्यात आलं होतं. आता रूपेरी पडद्यावर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम दाखवला जाणार आहे.