Sussanne Khan ने इन्स्टाग्रामवर स्वत:चा उल्लेख मुलगा असा केला, Ex-Husband हृतिक रोशन ने दिली ही प्रतिक्रिया
Sussanne Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा सुपर हिरो हृतिक रोशन (Hrithik Roshan) याची एक्स वाइफ तसेच इंटीरियर डिझायनर सुजान खान (Sussane Khan) सध्या तिच्या सोशल मिडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये तिने स्वत:चा उल्लेख मुलगा असे केला आहे. तिने अलीकडेच तिची एक मिरर सेल्फी शेअर केली आहे. यामध्ये ती सैलसर पांढरा शर्ट आणि काळी पँट घातली आहे. यात तिची स्टाईल आणि तिचा स्वॅग सर्वांनाच भावला आहे. या पोस्टखाली तिने स्वत:ला आपण मुलगा दिसत असल्याचे सांगितले आहे.

सुजैनने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, "कधी कधी माझ्या डोक्यात विचार येतो, की मला वाटते मी मुलगा आहे." ही पोस्ट पाहिल्यानंतर हृतिक रोशनने सुद्धा या पोस्टला मजेशीर कमेंट केली आहे.हेदेखील वाचा- Pathan Film: Shah Rukh Khan बनला भारतातील Highest-Paid अभिनेता? कमबॅक चित्रपट 'पठाण'साठी 100 कोटी रुपये घेतल्याची चर्चा

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

हृतिक म्हणाला, "हाहाहा, उत्कृष्ट फोटो". तर रवीना टंडन म्हणाली, "जास्तकरून स्कॉर्पिओ महिलांसोबत असेच होते." या फोटोला कमेंट करुन सुझानच्या सर्व चाहत्यांनी तिच्या सौंद्याची स्तुती केली आहे.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार, सुजानला मुंबईच्या एका नाइट क्लबमधून अटक केली होती. कारण तिने कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन केले होते. तिने सोशल मिडियावर ही बातमी चुकीचे असल्याचे सांगितले.

लॉकडाऊन दरम्यान आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी ती घटस्फोट झालेला असतानाही हृतिक रोशनच्या घरी राहिली होती. हृतिकने याबद्दल तिचे सोशल मिडियाच्या माध्यमातून तिचे अभिनंदन केले होते.