Sushant Singh Rajput Case: सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ति ने रिया चक्रवर्तीला विचारला प्रश्न, म्हणाली पैसे नाहीत तर देशातील सर्वात महागडा वकिल कसा नियुक्त केलास?
Shweta Singh Kirti and Rhea Chakraborty (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत प्रकरण (Sushant Singh Rajput) CBI कडे गेल्यानंतर या घटनेचा तपास वेगाने सुरु झाला आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीमुळे (Rhea Chakraborty) या प्रकरणाला एक वेगळेच वळण आल्यानंतर दोषींना लवकरात लवकर अटक व्हावी अशी सुशांतच्या चाहत्यांकडून मागणी होतेय. त्यात सुशांतच्या बँक अकाउंटवरुन कोटींची उलाढाल करणारी रियाने आपल्याकडे घराचे EMI भरायला पैसे नाही असे एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यावर टिका करत सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्ति (Shweta Singh Kirti) हिने सोशल मिडियाच्या माध्यमातून एक प्रश्न केला आहे.

श्वेता ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रियाची मुलाखत शेअर करुन म्हटले आहे की, 'जर तुझ्याकडे EMI भरायला पैसे नाहीत तर तू देशातील सर्वात महागडा वकिल कसा काय नियुक्त केलास?' Sushant Singh Rajput Case: आदित्य ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीसंदर्भात रिया चक्रवर्तीने केलं मोठ वक्तव्य; पहा काय म्हणाली

रियाने या मुलाखतीत म्हटले होते की, आपल्या एका प्रॉपर्टीसाठी बँकेकडून तिने 50 लाखांचे लोन घेतले आहे. त्यामुळे तिला आता हे टेन्शन आहे की, यासाठीचा 17,000 चा EMI ती कसा भरणार. आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत.

श्वेताने विचारलेला हा प्रश्न सर्वांना अचंबित करणारा आहे. रिया चक्रवर्तीने प्रसिद्ध वकिल सतीश मानेशिंदे यांच्याकडे आपली केस दिली असून यांनी याआधी संजय दत्तची देखील केस लढविली होती.