Sushant Singh Rajput Case: आदित्य ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीसंदर्भात रिया चक्रवर्तीने केलं मोठ वक्तव्य; पहा काय म्हणाली
Aaditya Thackeray, Riya Chakraborty (PC - Instagram)

Sushant Singh Rajput Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त काळावधी उलटला आहे. या काळात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची प्रियसी रिया चक्रवर्ती (Riya Chakraborty) हिच्यावर अनेक आरोप लावण्यात आले आहेत. मात्र, रियाने NDTV ला दिलेल्या मुलाखतीत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात शिवसेना नेते, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचदेखील नाव जोडण्यात आलं होतं. अखेर रियाने यासंबंधी मोठा खुलासा केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रिया आणि आदित्य ठाकरे एकमेकांना ओळखत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, मी आदित्य ठाकरे यांना कधीचं भेटले नाही. कधी त्यांच्याशी माझं बोलणंदेखील झालं नाही. त्यामुळे मी त्यांना ओळखत नाही. फक्त ते एक राजकीय व्यक्ती आहे. एक नेता आहेत, एवढंच मला माहित आहे, असं स्पष्ट वक्तव्य रियाने NDTV ला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Case: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली सुशांत सिंह राजपूतचे वडील के के सिंह यांची भेट)

रियाने या मुलाखतीत स्वत: वरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी कोणतही वाईट काम केलंल नाही. सध्या मी आणि माझं कुटुंब प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रासातून जात आहे. मी आता खचले आहे. मात्र, तरीदेखील मी माझा आणि कुटुंबाचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मी कोणत्याही ड्रग डिलरची भेट घेतलेली नाही आणि कधी ड्रग्सचं सेवनही केलेलं नाही. त्यामुळे मी रक्त तपासणीसाठी तयार आहे, असंही रियाने म्हटलं आहे. (हेही वाचा -

रियाने सुशांत सोबतच्या पहिल्या भेटीविषयीदेखील मोठा खुलासा केला आहे. 2013 मध्ये पहिल्यांदा सुशांतला भेटली असल्याचं रियांने म्हटलं आहे. अफेरपूर्वी आम्ही चांगले मित्र होतो. त्यानंतर त्याने मला प्रपोज केलं. त्यानंतर आम्ही एक कपल म्हणून राहू लागलो, असंही रियाने म्हटलं आहे.