Sushant Singh Rajput Case: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली सुशांत सिंह राजपूतचे वडील के के सिंह यांची भेट

Sushant Singh Rajput Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येसंदर्भात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सीबीआयकडून (CBI) या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. अशातचं आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी सुशांतचे वडील के. के. सिंह आणि बहिण राणी सिंह यांची फरीदाबाद (Faridabad) येथे भेट घेतली.

Sushant Singh Rajput Case: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली सुशांत सिंह राजपूतचे वडील के के सिंह यांची भेट
Ramdas Athawale meets actor SSR father KK Singh (PC - ANI)

Sushant Singh Rajput Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येसंदर्भात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सीबीआयकडून (CBI) या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. अशातचं आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी सुशांतचे वडील के. के. सिंह आणि बहिण राणी सिंह यांची फरीदाबाद (Faridabad) येथे भेट घेतली.

यासंदर्भात अधिक बोलताना रामदास आठवले म्हणाले की, सुशांतने मुंबईला येऊन स्वत:ची प्रतिमा तयार केली होती. कोणताही अभिनेता येवढ्या सहजासहजी आत्महत्या करू शकत नाही. सुशांत भविष्यात मोठा कलाकार झाला असता. त्यामुळे मला वाटतं की, सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या केली असावी. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Death Case: सुशांतच्या मृत्यूप्रकरणी लावण्यात आलेल्या आरोपांनंतर रिया चक्रवर्ती हिने सुद्धा आत्महत्या करावीशी वाटत असल्याचा केला धक्कादायक खुलासा)

दरम्यान, आज सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी त्याची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सीबीआयकडून समन्स बजावण्यात आलं आहे. सीबीआयकडून रियाची चौकशी सुरू आहे. गेल्या आठवड्याभरापासून सीबीआयकडून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. सीबीआयने आतापर्यंत सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरज यांची चौकशी केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2020 12:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).