
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर दिवसागणिक नव्याने खुलासे होतान दिसून येत आहेत. याच दरम्यान काल रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिया हिला सुशांतच्या मृत्यू प्रकरणी काही प्रश्न विचारले असता तिने तिच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावल्याचे दिसून आले आहे. तसेच सध्याची परिस्थिती पाहता सर्व बाजूने रिया हिच्यावर टीका करण्यासह विविध गंभीर आरोप लावण्यात आल्याने तिने मला आत्महत्या करावीशी वाटत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया हिने त्याचे घर सोडले होते. परंतु त्यानंतर सुशांतच्या आत्महत्येनंतर विविध गोष्टी समोर आल्यानंतर त्यात रिया हिचे नाव पुढे आले होते. कारण रियाच त्याच्या सोबत राहत असल्याने मुख्यत्वे तिलाच धारेवर धरत तिच सुशांतच्या आत्महत्येचे कारण असल्याची चर्चा सुरु झाली होती. यावर मात्र आता रिया हिने या सर्व प्रकारांमुळे मला आत्महत्येचे विचार आल्याचे म्हटले आहे. ऐवढेच नाही तर फाशी द्यावी असे सुद्धा बोलले जात असेल. असे असल्यास माझ कुटुंब एका रांगेत उभे राहिल आणि आमच्यावर गोळ्या झाडून आम्हाला संपवून टाका असे विधान सुद्धा मुलाखतीत रिया हिने म्हटले आहे.(Sushant Singh Rajput Case: 'रिया चक्रवर्ती सुशांतला विष देत होती, तिच Murderer' सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांंचे गंभीर आरोप)
रिया हिचे ड्र्ग्स संबंधित सुद्धा नाव जोडले गेल्याने आता प्रकरण अधिक तापले गेले आहे. परंतु रिया हिने मी कधीच ड्रग्स घेतले नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्यावर लावण्यात आलेले हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे ही तिने म्हटले आहे. मी एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी असून आता माझे जीवन जगणे मुश्किल झाल्याची नाराजी सुद्धा तिने व्यक्त केली आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून चौकशी केली जात असून आज सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठानी आणि रिया चक्रवर्ती यांची चौकशी होणार आहे.