Sushant Singh Rajput Case: 'रिया चक्रवर्ती सुशांतला विष देत होती, तिच Murderer' सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांंचे गंभीर आरोप
KK Singh| Photo Credits: Twitter/ ANI

अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर रोज नवनवे खुलासे होत असल्याने दिवसागणिक या प्रकरणाला नवं वळण मिळत आहे. आता सुशांत सिंग राजपूत याचे वडील के. के सिंह (KK Singh) यांनी ANI वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीमध्ये रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यामते, 'रिया सुशांत सिंह राजपूतला अनेक वर्षांपासून विष देत होती. रिया सुशांतच्या मृत्यूला जबाबदार आहे. तपास यंत्रणांनी रियासोबत तिच्या सहकार्‍यांना अटक करावी'. मुंबईमध्ये सध्या सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम दाखल आहे.

मुंबईमध्ये सुशांतच्या राहत्या घरी त्याने 14 जून दिवशी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर मुंबईत सुशांतवर अंत्यसंस्कार झाले. सुशांतचे कुटुंब पाटनामध्ये परतल्यानंतर सुशांतच्या वडिलांनी स्थानिक पोलिस स्थानकामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरूद्ध FIR दाखल केली आहे. त्यामध्येही रिया सुशांतच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केके सिंह यांनी केला आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांची प्रतिक्रिया

दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार काल रिया चक्रवर्तीचे काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स समोर आले आहेत. यामध्ये रिया, सुशांत ड्रग्स घेत असल्याचा संशय आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार या प्रकरणी ड्रग्जचा वापर झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी आता Narcotics Control Bureau (NCB)ची मदत घेतली जाणार आहे.