Sushant Singh Rajput, Singer Shweta Pandit (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या जाण्याने चाह्त्यांसोबत इंडस्ट्रीमधील अनेकांना फार मोठा धक्का बसला आहे. डिप्रेशनमुळे सुशांतने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र इतकी प्रसिद्धी, पैसा मिळूनही सुशांत एकटा होता, ही गोष्ट अनेकांच्या मनाला लागली आहे. यानंतर इंडस्ट्रीमधील एक विदारक सत्य समोर येत आहे. अनेक कारणास्तव लोक एकमेकांशी बोलत नाहीत, बाहेरच्या कलाकारांना एकटे पाडले जात आहे, याच मुद्द्यावर सध्या चर्चा रंगत आहे. अशात गायिका श्वेता पंडितनेही तिला अनुभव शेअर केला आहे. गायिका श्वेता पंडितने (Singer Shweta Pandit) गेली 3 वर्षे हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम केले नाही, मात्र या दरम्यान तिची कोणीही विचारपूस केली नसल्याची खंत श्वेताने व्यक्त केली आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना श्वेता म्हणते, '15 जून रोजी, मी भारतीय संगीत उद्योगात 21 वर्षे पूर्ण केली. आजच्याच दिवशी 1999 साली मी मोहब्बतेसाठी गाणे रेकॉर्ड केले होते. मी त्यावेळी शाळेत (आठवी) होते. आता 3 वर्ष झाली मी हिंदी चित्रपटात गीत गायले नाही. या 21 वर्षांत मी अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे परंतु या 3 वर्षांत माझी साधी विचारपूस करायला कोणीही फोन केला नाही. जर का तुम्ही बहराचे असाल तर 'हे' लोक तुम्हाला कधी बाहेर फेकून देतील हे समजणार ही नाही. ' अशा प्रकारे श्वेता पंडितने या हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला आलेला अनुभव शेअर केला आहे. (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडकरांवर भडकली कंगना रनौत; 'ही आत्महत्या नव्हती, तर ठरवून केलेला खून होता' (Watch Video))

पहा ट्वीट्स -

काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, सुशांत हा इंडस्ट्रीबाहेरील असल्याने त्याला स्ट्रगल करावा लागला होता, अगदी शेवटच्या क्षणी त्याच्या हातून अनेक चित्रपट गेले होते, अशा अनेक गोष्टींचा परिणाम त्याच्या विचारांवर झाला होता व त्याचमुळे त्याला डिप्रेशन आल्याची शक्यता होती. या दरम्यान त्याच्याशी बोलायला जवळचे कोणी नसल्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. असाच अनुभव इंडस्ट्रीमधील अनेकांना आला आहे व आता श्वेता पंडितने आपला हा अनुभव शेअर केला आहे.