Kangana Ranaut. Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे त्याने आत्महत्या केल्याचे दुःख सर्वात जास्त आहे. सध्या यासाठी सुशांतचे डिप्रेशन कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र प्रश्न उरतो की सुशांतला नक्की डिप्रेशन कशामुळे आले? यासाठी अर्थातच सुशांतचे बॉलीवूडमध्ये पाय रोवणे आणि त्यासाठी यश न लाभणे हीच गोष्ट समोर येते. आता याच मुद्द्यावर अभिनेत्री कंगना रानौतने )Kangana Ranaut) सो कॉल्ड बॉलीवूडकरांवर आरोप केले आहेत. ‘सुशांतचा मृत्यू हा आत्महत्येमुळे नाही तर तो एक ठरवून केलेला खून (Planned Murder) होता,’ असे कंगनाने म्हटले आहे.

कंगना रनौत स्वतः एक आऊटसायडर आहे मात्र तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये फार मोठे स्थान निर्माण केले. आता सुशांतच्या आत्महत्येनंतर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती म्हणते की, ‘बाहेरच्या लोकांना इंडस्ट्री आपलेसे करून घेत नाही. त्यांना दूर लोटले जाते, त्यांच्या मनावर बिंबवले जाते की तुम्ही कमकुवत आहात, तुम्ही इथे टिकू शकणार नाही. मलाही असाच अनुभव आला होता मात्र मी यातून तरले. पण सुशांतला ही गोष्ट जमली नाही.’ लोकांनी त्याला सांगितले तु वीक आहे व त्याने ती गोष्ट मानून आत्महत्या केली.’ (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूत च्या पोस्टमोर्टम रिपोर्ट नुसार गळफासानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट; कोरोना चाचणीतुन झाले 'हे' निदान)

पहा व्हिडिओ -

पुढे ती म्हणते, ‘सुशांत लोकांना सांगत राहिला की, कृपया माझे चित्रपट पहा नाहीतर मला इंडस्ट्रीमधून काढून टाकले जाईल. मात्र त्याच्यावर ही वेळ का आली? इंडस्ट्री त्याचा का नाही स्वीकार करू शकत? गलीबॉय सारख्या वाईट चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळतात, मात्र सुशांतच्या ‘छीछोरे’ला कुणी विचारलेही नाही. माझ्याही बाबतीत असेच घडले. माझ्या सुपरहिट चित्रपटांना फ्लॉप संबोधले गेले. माझ्यावर 6 केसेस केल्या गेल्या, मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. इथे सुशांतची एकच चूक झाली ती म्हणजे, लोकांनी त्याला सांगितले तु कमकुवत आहेस व त्याने ते एकले.’