Sushant Singh Rajput Death Case: अभिनेत्री Rhea Chakraborty ने सुशांत सिंह राजपूतला अनेकवेळा दिला होता गांजा; NCB चा दावा
Rhea Chakraborty, Sushant Singh Rajput (Photo Credits: Facebook/Instagram)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणात (Drugs Case) दाखल करण्याचा मसुदा तयार केला आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहेक की, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) तिचा भाऊ शोविकसह सहआरोपींकडून अनेकदा गांजा घेतला होता आणि तो सुशांत सिंग राजपूतला देण्यात आला होता. मसुद्याच्या आरोपांनुसार, सर्व आरोपींनी मार्च 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान गुन्हेगारी कट रचला, जेणेकरून ते ‘हाय सोसायटी आणि बॉलीवूड’ मध्ये अंमली पदार्थांचे वितरण, विक्री आणि खरेदी करू शकतील.

एनसीबीने म्हटले आहे की, रियाने सुशांच्या घराचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, घरातील कर्मचारी दीपेश सावंत आणि इतरांकडून गांजा प्राप्त केला होता आणि तो दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला दिला. या तिघांनाही अटक करण्यात आली असून ते या प्रकरणात आरोपी आहेत. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. एनसीबीने सांगितले की, आरोपींनी मुंबई महानगर प्रदेशात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वित्तपुरवठा केला होता आणि गांजा, चरस, कोकेन आणि इतर अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचा वापर केला होता.

आरोपांच्या मसुद्यानुसार, रियाचा भाऊ शौविक अमली पदार्थ तस्करांच्या नियमित संपर्कात होता. मसुद्याच्या आरोपांनुसार, कलम 27 आणि 27 अ, 28, 29 यासह एनडीपीएस कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. एजन्सीने 22 जून रोजी शौविकसह 35 आरोपींविरुद्ध आरोपांचा मसुदा सादर केला. ड्राफ्ट चार्जेस हे आरोप आहेत जे एजन्सी आरोपींविरुद्ध खटला चालवण्यासाठी कोर्टाला प्रस्तावित करते. (हेही वाचा: बॉलिवूड अभिनेता Suniel Shetty च्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे; Athiya Shetty आणि क्रिकेटर KL Rahul मुंबईमध्ये अडकणार लग्नबंधनात- Reports)

एनडीपीएस कायद्याशी संबंधित खटल्यांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश व्ही जी रघुवंशी यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 27 जुलैची तारीख निश्चित केली आहे. या प्रकरणी चक्रवर्तीला सप्टेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होती आणि एका महिन्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला होता. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगात कथित ड्रग वापराचा तपास सुरू केला.