सुशांत सिंह राजपूत आणि सिद्धार्थ पिठानी (Photo Credits: Instagram/Twitter)

Sushant Singh Rajput Case:  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा रुममेट सिद्धार्थ पिठानी याला गेल्या वर्षात 14 जून मध्ये अभिनेत्याच्या मृत्यू प्रकरणी ड्रग्ज संबंधित हैदराबाद येथे अटक करण्यात आली आहे. पिठानी याची आता एनसीबी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. एनसीबीचे झोनल निर्देशक समीर वानखेडे यांनी असे म्हटले की, पिठानी याला मुंबईतील एका कोर्टात हजर केले गेले. त्यानंतर त्याला 1 जून पर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

पिठाणी याला तपासात सहभागी होण्यास सांगितले होते. मात्र त्याने याकडे दुलर्क्ष केल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याबद्दल अधिक माहिती काढली. वानखेडे यांनी असे म्हटले की, औषध कायदा अंमलबजावणी एजेंसी यांना कळले की तो हैरदाबाद येथे राहत आहे. त्यानंतर 25 मे रोजी पिठानी याचा तपास करण्यासाठी मुंबई येथून एक टीम पाठवण्यात आली. जो गेल्या काही दिवसांपासून पिठानी पळ काढत होता.(Sushant Singh Rajput सारख्या दिसणाऱ्या Sachin Tiwari ची सोशल मीडियात चर्चा; पहा Photos आणि Videos)

त्यांनी असे म्हटले की, एनसीबी मुंबई टीम हैदराबाद मध्ये एनसीबी, सब झोनल युनिट द्वारे मदत करण्यात आली. त्यांनी म्हटले की, पिठानी याला 26 मे रोजी अटक करण्यात आली आणि नंतर त्याचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर ट्रांजजिट रिमांडसाठी हैदराबादच्या एका कोर्टात हजर करण्यात आले. वानखेडे यांनी म्हटले की, ट्रांजिट रिमांडसह पिठानी याला 28 मे रोजी मुंबईत आणले गेले आणि कोर्टात हजर केले.

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड ड्रग्ज माफिया तपासात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक आणि अन्य 33 जणांच्या विरोधात 12 हजार पानांचे चार्जशीट दाखल केले. त्यानंतर जवळजवळ दीड महिन्यांनी अटक करण्यात आली.