Sushant Singh Rajput सारख्या दिसणाऱ्या Sachin Tiwari ची सोशल मीडियात चर्चा; पहा Photos आणि Videos
Sachin Tiwari & Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram

Sushant Singh Rajput Lookalike Sachin Tiwari: अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीचे ड्युप्लिकेट आतापर्यंत समोर आले आहेत. लुक्स आणि पर्सनालिटी यात बहुतांश साम्य असल्याने या ड्युप्लिकेट्सची सोशल मीडियात खूप चर्चा होते. ऐश्वर्या राय, कैटरीना कैफ यांसारख्या अन्य कलाकारांचे ड्युप्लिकेट यापूर्वी चर्चेत आले आहेत. आता दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत सारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीची सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. या व्यक्तीचे लुक्स, पर्सनालिटी आणि स्टाईल सुशांत सिंह राजपूतशी अत्यंत मिळती जुळती आहे.

मागील वर्षी 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याचे निधन झाले. त्याच्या अकाली एक्झिटनंतर संपूर्ण चाहतावर्ग हळहळला होता. त्यामुळे आता सचिन तिवारी याचे फोटोज आणि व्हिडिओज पाहून चाहते थक्क झाले असून सुशांत सिंह राजपूत परत आल्याची त्यांची भावना आहे. (Holi 2021: सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिज यांचा होळीतला भन्नाट डान्स पाहिलात का? व्हिडिओ पाहून होतील आठवणी ताज्या)

पहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tiwari (@officialtiwarisachin)

व्हिडिओज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tiwari (@officialtiwarisachin)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tiwari (@officialtiwarisachin)

सचिन तिवारीच्या फोटोज आणि व्हिडिओवर अधिकतर लोक कमेंट करुन त्याची तुलना सुशांतसोबत करत आहेत. सचिनला पाहून चाहत्यांच्या मनातील सुशांतच्या आठवणी ताज्या होत आहेत. दरम्यान, सचिनचे टिकटॉक, इंस्टाग्रामवरील अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत.