Sushant Singh Rajput Case: तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच मीडिया समोर दिसली रिया चक्रवर्ती, सांताक्रुज पोलीस स्थानकात पोहचली
रिया चक्रवर्ती (Image Credit: Yogen Shah)

Sushant Singh Rajput Case: ड्रग्ज प्रकरणी गेल्या एका महिन्यापासून तुरुंगात राहाणाऱ्या रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर बॉम्बे हायकोर्टाने सुनावणी करत तिसा 7 ऑक्टोंबर पर्यंत जामीन दिला आहे. तर तिचा भाऊ शौविक चक्रवर्त याची जामिन याचिका फेटाळून लावली आहे. रिया काल संध्याकाळी आपल्या घरी परतली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रथमच रिया चक्रवर्ती मीडिया समोर आल्याचे दिसून आले. खरंतर या वेळी रिया अधिक त्रस्त असल्याचे दिसले. तिने मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर कोणतेच विधान किंवा प्रतिक्रिया दिली नाही. या वेळी रिया हिने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि ब्लू रंगाची जीन्स घातल्याचे दिसून आले होते.(Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत याची हत्या नसून आत्महत्याच; AIIMS चा अंतिम अहवाल CBI कडे सुपूर्त)

रिया हिला जामिन काही अटींच्या आधारावर दिला आहे. त्यामुळे अभिनेत्रीला 10 दिवस आपल्या घराजवळील पोलीस स्थानकात सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हजर रहावे लागणार आहे.(Sushant Singh Rajput Case: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल सीबीआयने सार्वजनिक करावा; महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी)

 

View this post on Instagram

 

#rheachakraborty Clicked in Santacruz today. #yogenshah @yogenshah_s

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

दरम्यान, रिया हिला जामिन दिल्याने तिच्या आईने आनंद व्यक्त केला आहे. त्याचसोबत तिच्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांमधून बाहेर पडणे तिच्यासाठी थोडे कठीण असेल असे ही तिची आई म्हणाली. तिला दु:खातून बाहेर काढण्यासाठी थेरपी करावी लागेल. ती तुरुंगातून बाहेर आली आहे पण अद्याप हे सर्व काही संपलेले नाही. माझा मुलगा तुरुंगात आता पर्यंत का बंद आहे.