Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर 11 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
Sushant Singh Rajput, Rhea Chakraborty (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले असून नवनव्या गोष्टींचा उलगडा होत आहे. शुक्रवारी (7 ऑगस्ट) ला या संदर्भात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिची मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर येत्या 11 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुशांतच्या वडिलांनी रियासह 6 लोकांवर पटना पोलिस स्टेशनात FIR दाखल केली होती. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सुशांतचे चाहते गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत.

रिया चक्रवर्ती आपली केस ही पटनाकडून मुंबईकडे देण्यात यावी अशी याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर 5 ऑगस्टला पहिली सुनावणी होणार होती. मात्र बिहार सरकारने रियाची याचिका रद्द करण्यात यावी अशी मागणी केली होती. आता आलेल्या नव्या रिपोर्टनुसार, येत्या 11 ऑगस्टला सुनावणी होईल. Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीचे Call Details झाले उघड; सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर बांद्रा DCP Abhishek Trimukhe यांच्याशी झाले अनेकवेळा बोलणे

दरम्यान सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झाला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्तीने केलेल्या कॉल डिटेल्सच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की, गेल्या एका वर्षात रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूतला केवळ 142 वेळा फोन केला होता, तर तिने तिच्या स्टाफला तब्बल 502 वेळा कॉल केला होता. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रियाचे गेल्या एका वर्षातील कॉल डीटेल्स समोर आले आहेत. या दरम्यान रिया आपल्या भावाशी फोनवर 886 वेळा बोलली आहे, तर आपल्या आईला तिने 890 वेळा कॉल केला होता.