Sunny Leone | (Photo credit: archived, edited, representative image)

Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुकीत बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीमधील सुमारे 30 पेक्षा अधिक सेलिब्रिटी कलाकार राजकीय पक्षांकडून पैसे घेऊन निवडणूक प्रचार करतील, अशा दावा ‘कोब्रा पोस्ट’ने केला आहे. ‘कोब्रा पोस्ट’( Cobrapost)ने केवळ दवाच केला नाही तर, त्यासोबत या कलाकारांची यादीही प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर बॉलिवुडमध्ये एकच खळबळ उडाली असून, बरेच कलाकार आपल्या बाजूने स्पष्टीकरण देत आहेत. यात अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone) हिच्यापासून अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आदी कलाकारांचाही समावेश आहे. सनी लियोन आणि सोनू सूद यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे.

'जे पटतं तेच मी करते'

दरम्यान, सनी लयोन हिने टेविटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी मी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करत नाही आहे. जर तसं काही असेल तर आगोदर मी जाहीरपणे स्पष्ट सांगेन. त्यानंतरच प्रचारात उतरेन. मला जे पटतं तेच मी करते. ज्या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत त्या मी कधीच करत नाही, असे सनीने ट्विटर हॅंडलवर ट्विट करुन म्हटले आहे. (हेही वाचा, मादाम तुसादमध्ये पहायला मिळणार सनी लियॉनचा पुतळा)

'चर्चेतील काहीच भाग दाखवण्यात आला'

दुसऱ्या बाजूला अभिनेता सोनू सूद यानेही ट्विटरच्या माध्यमातून आपले स्पष्टीकरण दिले आहे. आमच्यात चर्चा झाली. मात्र, झालेल्या चर्चेतील मुद्दे तोडून मोडून दाखवण्यात आले. या चर्चेतील काहीच भाग दाखवण्यात आला. राजकीय पक्ष, कार्पोरेट कंपन्या, मोठमोठाले ब्रँड अशा अनेकांकडून कलाकारांना जाहिरातींबाबत विचारण्यात येते. अनेक कलाकार अशा जाहिरातींसाठी तयारही होता. परंतु, सध्या सादर करण्यात आलेला कंटेंट चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे. त्यामुळेच अनेकांची नावे यादीत आली असल्याचे सोनू सूद याने म्हटले आहे.

कोब्रा पोस्टने सादर केलेली कलाकारांची काही नावे

आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचा प्रचार करणार असलेल्या कालाकांची एक यादी कोब्रा पोस्टने दिली आहे. यादीनुसार काही नावे पुढीलप्रमाणे - जॅकी श्रॉफ, शक्ती कपूर, विवेक ओबेरॉय, सोनू सुद, अमिषा पटेल, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, पुनीत इस्सर, सुरेंद्र पाल, पंकज धीर, निकीतिन धीर, टिस्का चोप्रा, दीपशिखा नागपाल, अखिलेंद्र मिश्रा, रोहित रॉय, राहुल भट्ट, सलीम जैदी, राखी सावंत, अमन वर्मा, हितेन तेजवानी, गौरी प्रधान, सनी लिओनी, कोयना मित्रा, इवलिन शर्मा, पूनम पांडे आदी.