अभिनेत्री सनी लियॉन म्हणजे एक नेहमीच चर्तेत असलेले नाव. काहींच्या कौतुकाचे तर, काहींच्या टीकेचा, हेटाळणीचा विषय. पण, बऱ्या वाईट चर्चेचा सनी एक व्यक्ती म्हणून फारसा परिणाम करुन घेत नसावी. म्हणूनच कदाचित तिच्या एकूण कामगिरीची दखल बॉलिवूड ते इंटरनेट आणि समाजातील अनेक घटक घेत असावेत. आता सनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचा कोणता चित्रपट, आयटम सॉंग नव्हे. तर, या चर्चेचे कारण आहे सनीचा पुतळा. होय, अभिनेत्री सनी लियॉनचा पुतळा आता मादाम तुसाद या प्रसिद्ध संग्रहालयात उभारण्यात येणार आहे.
सनीच्या पुतळ्यासाठी खास जागा
मादम तुसा या संग्रहालयात अत्यंत लोकप्रिय व्यक्तिंचे पुतळे उभारण्यात येतात. या आधी बॉलिवुड अभिनेत्री काजोलचाही पुतळा मादाम तुसाद लावण्यात आला आहे. काजोलनंतर हा मान सनीला मिळाला आहे. दरम्यान, लंडनहून आलेल्या कलाकारांच्या एका पथकाने सनी लियॉन हिची मुंबईत भेट घेतली. या पथकाने सनी लियॉनच्या शरीराची २००हून अधिक मापे घेतली. सोबत सनीची काही छायाचित्रेही टिपण्यात आली. जेणेकरुन सनीच्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारा पुतळा उभारण्यात येईल.
सनीने मानले आभारी
दरम्यान, सनीने म्हटले आहे की, माझा पुतळा मादाम तुसादमध्ये उभारला जातोय याचा मला फार आनंद झाला आहे. माझ्यासाठी हा अत्यंत रोमांचकारी क्षण आहे. माझा प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. या काळात मला सहकार्य करणाऱ्या माझ्या सर्व टीमचे मी आभार मानते. मादाम तुसादमधील माझा पुतळा पाहण्यासाठी मी प्रचंड उत्साही आहे.