Sunny Leone ने शेअर केले Halloween Celebration चे फोटो; पहा पती डॅनियल वेबरसोबतचा मजेशीर अंदाज
Sunny Leone Halloween Photos (PC - Instagram)

Sunny Leone Halloween Photos: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) आपल्या हॉट, सुंदर आणि स्टाईल अदांमुळे नेहमीचं चाहत्यांचे मने जिंकत असते. आपल्या कुटुंबासमवेत अमेरिकेत (America) राहत असलेल्या सनीने तिच्या हॅलोवीन सेलिब्रेशन (Halloween Celebration) चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूप मजेदार स्टाईलमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये तिच्यासोबत तिचा पती डॅनियल वेबरदेखील (Daniel Weber) दिसली आहे. सनीने इंस्टाग्रामवर हे फोटो पोस्ट करताना म्हटलंय की, "हॅपी हॅलोवीन, आशा आहे की, यावर्षी सर्वांनी आनंद लुटला. हॅलोवीन ही माझी वर्षातील सर्वात आवडती सुट्टी आहे. डॅनियल वेबर आणि मी काहीतरी करण्यास अशा पद्धतीने तयार झालो. परंतु, यानिमित्ताने आम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला." (हेही वाचा - Aishwarya Rai ने मुलगी Aaradhya सोबतचे खास फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे मानले आभार)

दरम्यान, या फोटोंमध्ये सनी अतिशय मजेदार स्टाईलमध्ये दिसत आहे. तिने हॅलोवीन निमित्त घातलेला पोशाख खूपचं रंजक आहे. तिचा हा लूक पाहून चाहते हसत आहेत. सहसा हॅलोविनच्या दिवशी लोक घाबरवणाऱ्या अंदाजात दिसतात. पण डॅनियल आणि सनी हॅलोविननिमित्त अतिशय मजेदार शैलीत पाहायला मिळाले. (वाचा - Amrita Rao Blessed With A Baby Boy: अमृता राव आणि आरजे अनमोल च्या घरी चिमुकल्याचे आगमन, गोंडस मुलाला दिला जन्म)

लॉकडाऊन दरम्यान सनी आपल्या कुटुंबासमवेत अमेरिकेत गेली होती. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे. सनी सोशल मीडियावर खूपचं अ‍ॅक्टिव्ह असते. ती आपल्या चाहत्यांनी दररोज नव-नवीन फोटो शेअर करत असते. सनीच्या या फोटोंना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो.