इश्क विश्क या चित्रपटातून अनेक तरुणांची मन जिंकणारी गोंडस, निरागस चेह-याची अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) ही नुकतीच आई झाली आहे. अमृता राव आणि आरजे अनमोल (RJ Anmol) हे माता पिता झाले असून अमृताने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण तिचे बेबी बंपसह फोटो पाहत होतो. त्यामुळे तिला मुलगा होणार की मुलगी याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. बेबी बंपसाठी अमृताच्या चेह-यावर देखील गरोदर स्त्रीप्रमाणे छान ग्लो आला होता. तिच्या चाहत्यांना अमृता-अनमोल च्या टीमने ही गुड न्यूज दिली आहे.
अमृता ने रविवारी सकाळी एक गोंडस चिमुकल्याला जन्म दिला असून आई आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांच्या टिमने दिली आहे. हेदेखील वाचा- Amrita Rao Pregnant: अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल लवकरचं होणार आई-बाबा - रिपोर्ट्स
अमृताने विवाह, मैं हू ना, मस्ती, सत्याग्रह यांसारखे अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. अमृता आणि अनमोलने 2016 मध्ये लग्न केलं. त्यापूर्वी जवळपास 7 वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नातही अगदी जवळचे लोक आणि कुटुंबातील मित्र दिसले होते.
अमृताबद्दल बोलायचे झाले तर तिने मुख्यत: 'मैं हूं ना', 'एक विवाह ऐसा भी' आणि 'ठाकरे' यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विवाह चित्रपटात अमृताची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. अमृताचे चाहते आजही तिचा हा चित्रपट आवर्जून पाहतात.