Amrita Rao Pregnant: अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल लवकरचं होणार आई-बाबा - रिपोर्ट्स
RJ Anmol,Actress Amrita Rao (Photo Credits: Instagram)

Amrita Rao Pregnant: बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव (Actress Amrita Rao) च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री आणि तिचा नवरा आरजे अनमोल (RJ Anmol) लवकरचं आई-बाबा होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अमृता गर्भवती आहे. अलीकडेचं अमृताला तिच्या पतीच्यासोबत मुंबईतील खार भागातील क्लिनिकच्या बाहेर स्पॉट केले होते.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, 'अमृता आयुष्याच्या या टप्प्याचा पुरेपूर आनंद लुटत आहे. ती गर्भवती असल्याचं लोकांना माहित नसलं तरी, तिच्या जवळच्यांना याची माहिती आहे. लॉकडाऊनपूर्वी अमृता गर्भवती झाली होती. लॉकडाऊनमध्ये या अमृता आणि तिच्या पतीने एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला. अमृता आणि अनमोल दोघेही त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल खूप सजग आहेत. (हेही वाचा - #BollywoodStrikesBack: बॉलीवूडबाबत बेजबाबदार रिपोर्टिंग करणे वृत्त वाहिन्यांना पडले महागात; अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, करण जोहर आणि इतर 30 प्रॉडक्शन हाऊसेसनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली याचिका)

दरम्यान, 2016 मध्ये अमृता आणि अनमोलने एकमेकांशी लग्न केले होते. त्यांनी जवळजवळ 7 वर्षे एकमेकांना डेट केलं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नातही अगदी जवळचे लोक आणि कुटुंबातील मित्र दिसले होते.

अमृताबद्दल बोलायचे झाले तर तिने मुख्यत: 'मैं हूं ना', 'एक विवाह ऐसा भी' आणि 'ठाकरे' यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विवाह चित्रपटात अमृताची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. अमृताचे चाहते आजही तिचा हा चित्रपट आवर्जून पाहतात.