सनी लियोनी (Sunny Leone) म्हणजे इंटरनेटवर सर्वाधिक सर्च होणाऱ्या व्यक्तीमत्वांपैकी एक. त्यामुळे तिने काहीजरी केले तरी इंटरनेटवर तिला शधले जाते. तिच्याबद्दल जाणूनही घेतले जाते. अलिकडे ती बॉलिवूडमध्येही स्थिरावली आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करणारे अनेक कलाकार तिचे कौतुक करतात. बॉलीवुड एक्टर तनुज विरवानी (Tanuj Virvani) हा देखील त्यापैकीच एक. अलिकडेच त्याने पारस छाबडा यांच्या पॉडकॉस्टमध्ये आपले खासगी आणि व्यावसायिक आयुष्य, यांबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. या वेळी त्याने ‘स्प्लिटस्विला 15’ आणि ‘वन नाइट स्टँड’ मध्ये सनीसोबत केलेल्या कामाचा अनुभव सांगितला.
सनी लियोनी हिच्यासोबत ऑनस्क्रिन रोमान्स
‘वन नाइट स्टँड’ मध्ये काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल बोलताना तनुज विरवानी याने म्हटले की, सनीसोबत काम करताना खूपच छान वाटले. तिच्यासोबत ऑन स्क्रीन रोमान्स करताना कधीही दडपण आले नाही. अभिनेता सनी लियोनी हिच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला राहिला. तिच्यासोबत माझी ट्युनिंग चांगलीच जमली. तिच्याकडे एक वेगळ्याच प्रकारची विनोद निर्मितीची क्षमता आहे. कार्यक्रम हिट होण्याचे हे देखील एक कारण आहे. सनी सोबत मी एका प्रसिद्ध गाण्यामध्येही एकत्र काम केले होते. आमची केमेस्ट्री लोकांना चांगलीच आवडलीही होती. दरम्यान, वन नाईट स्टँड मधील ते सीन्स मला आता आठवत नाहीत, पण तिच्यासोबत केलेल्या कामाचा अनुभव खूपच छान होता.
स्पिटस्विला मध्येही सनी लियोनी हिच्यासोबत काम
पण, सनीसोबत मी स्पिटस्विला सुद्धा होस्ट केले. हा कार्यक्रम मी रणविजयच्या ऐवजी होस्ट केला होता. पण, तो मी अर्जुन बिजलानी याच्या बदलीही होस्ट केला होता. या कार्यक्रमाचे निर्माते जेव्हाही माझ्याकडे या कार्यक्रमासाठी ऑफर घेऊन आले, तेव्हा मी काहीसा संभ्रमित होतो. हा कार्यक्रम होस्ट करणे मला जमेल की नाही याबाबत मला स्वत:लाच साशंकता होती. कारण अशा प्रकारचा कार्यक्रम मी कधीही होस्ट केला नव्हता. मात्र, निर्मात्यांनी मलाच का निवडले जात आहे, याबाबत सांगितले तेव्हा मी त्याला होकार दिला. (हेही वाचा, Aditya Singh Rajput Dies: स्प्लिट्सविला 9 फेम अभिनेता 'आदित्य सिंग राजपूत'चे निधन; बाथरूममध्ये आढळला मृतदेह, ड्रग ओव्हरडोजचा संशय)
तनुज विरवानी अभिनेत्रीबद्दल बोलताना
अभिनेता तनुज विरवानी हा अभिनेत्री रति अग्निहोत्री आणि उद्योगपती अनिल विरवानी यांचा मुलगा आहे. त्याला अभिनय हा आपल्या आईकडूनच मिळाला आहे. त्याने 'लव यू सोनिया' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्याने इतरही काही वेवसीरिजमध्ये काम केले आहे.
कोण आहे सनी लियोनी?
बॉलिवूडमध्ये सनी लिओनी या नावाने वावरत असलेली ही अभिनेत्री पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार आहे. करणजीत "करेन" कौर वोहरा असे तिचे मूळ नाव असून, तिचा जन्म कॅनडामध्ये एका भारतीय पंजाबी शीख कुटुंबात झाला. तिच्याकडे कॅनडाचे आणि अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व आहे. तिला 2003 मध्ये पेंटहाऊस पेट ऑफ द इयर म्हणून नाव देण्यात आले. विशेष म्हणजे 12 टॉप पोर्न स्टार्सपैकी एक म्हणूनही तिला गणले गेले आहे. पाठिमागच्या काही वर्षांमध्ये तिने भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेस केला असून, बॉलिवुडमध्ये तिचे अनेक सिनेमे आले आहेत.