'स्प्लिट्सविला' आणि ‘गंदी बात' फेम अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत याचे निधन झाले आहे. आदित्य फक्त 32 वर्षांचा होता. सोमवार, 22 मे रोजी दुपारी त्याचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये आढळून आला. आदित्य मुंबईतील अंधेरी परिसरात राहत होता. इमारतीच्या 11व्या मजल्यावर राहणाऱ्या आदित्यचा मृतदेह प्रथम त्याच्या मित्राने पाहिला. तो बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडला होता. मित्राने तातडीने इमारतीच्या चौकीदाराला याची माहिती दिली, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आदित्य सिंग राजपूतच्या मृत्यूचे कारण ड्रग्जचे अतिसेवन असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्य सिंग राजपूतने 300 हून अधिक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले. अभिनयाच्या दुनियेत संघर्ष करत त्याने स्वतःचा ब्रँड 'पॉप कल्चर' सुरू केला, ज्या अंतर्गत त्याने कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले. (हेही वाचा: प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचा रस्ते अपघातात मृत्यू; 29 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
Actor Aditya Singh Rajput found dead at his apartment in Andheri area. Body sent for post-mortem. Investigation underway: Mumbai Police
(Pic: Aditya's Instagram) pic.twitter.com/1ZHbKB9ilp
— ANI (@ANI) May 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)