sridevi | Google Homepage

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्या 60 व्या स्मृतिदिनानिमित्त आज गूगलच्या होम पेज वर खास डूडलच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे. यामध्ये श्रीदेवीच्या आयकॉनिक सिनेमांचा समावेश करत तिच्या बॉलिवूड मधील प्रवासाची देखील झलक दिसत आहे. श्री देवी यांचं मूळ नाव श्री अम्मा यंगर अय्यपन (Shree Amma Yanger Ayyappan) होते. तमिळनाडू मध्ये Meenampatti मध्ये 13 ऑगस्ट 1963 साली त्यांचा जन्म झाला. वयाच्या चौथ्याच वर्षी त्यांनी सिनेक्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं.

श्रीदेवी यांनी तमिळ सिनेमा Kandhan Karunaiमध्ये बाल कलाकार म्हणून पहिल्यांदा काम केले. त्यावेळी त्यांनी Jayalalitha साकारली होती. वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी रानी मेना नाम सिनेमामधून बॉलिवूड मध्ये पाऊल ठेवले. हळूहळू आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने त्यांनी जगाला भुरळ पाडली.

बालकलाकार नंतर त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणूनही बॉलिवूड मध्ये पाऊल ठेवलं. अमोल पालेकर यांच्यासोबत त्यांनी सोलवा सावन आणि जितेंद्र यांच्यासोबत 'हिंमतवाला' सिनेमात वयाच्या 19व्या वर्षी काम केले होते. हिंम्मतवाला हा सिनेमा सुपर डुपर हीट ठरला होता. त्यानंतर त्यांनी 16 सिनेमे जितेंद्र यांच्यासोबत केले. मिस्टर इंडिया, चांदनी, इंग्लिश विंग्लिश, असे अनेक दर्जेदार सिनेमे त्यांनी दिले. Altina Schinasi's 116th Birthday Google Doodle: आयकॉनिक Cat-Eye Glasses च्या निर्मात्या अल्टिना शिनासी च्या 116 व्या जन्मदिना निमित्त खास गूगल डूडल .

बॉलिवूड मध्ये राज्य करणार्‍या या अभिनेत्रीचा अंत मात्र करूण झाला. Jumeirah Emirates Tower मध्ये 24 फेब्रुवारी 201 8 दिवशी श्रीदेवी बाथटब मध्ये मृतावस्थेमध्ये आढळल्या. कार्डिएक अरेस्टने त्याचं निधन झालं. “accidental drowning” मुळे रहस्यमय मृत्यूची अनेक चर्चा झाली होती.