SP Balasubrahmanyam Funeral: प्रसिद्ध गायक एस पी बालासुब्रमण्यम यांच्यावर आज चेन्नईत शासकीय इतमामात केले जाणार अंत्यसंस्कार
SP Balasubramanyam (Photo Credits: Instagram)

आपल्या जादुई आवाजाने अवघ्या भारताला वेड लावणारे ज्येष्ठ गायक एस पी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांचे शुक्रवारी (25 सप्टेंबर) ला चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते या रुग्णालयात व्हेंटिलेटरवर (Ventilator) उपचार घेत होते. मात्र काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्याआधी त्यांना कोरोनाची लागणही (COVID-19 Positive) झाली होती. मात्र त्यातून ती बरे झाले होते. मात्र त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांच्या निधनाने सा-या चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून हे मनोरंजन विश्वास सर्वात मोठे नुकसान मानले जात आहे. आज एस पी बालासुब्रमण्यम यांच्यावर चेन्नईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. चेन्नई पासून 34 किमी दूर असलेल्या पक्कम (Pakkam) मध्ये राजकीय सन्मानासह त्यांना अंतिम निरोप दिला जाईल.

एस पी बालासुब्रमण्यम यांचे पार्थिव शुक्रवारी रात्री त्यांच्या फार्महाऊसवर आणण्यात आले आहे. येथे त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सिनेसृष्टीतील दिग्गज, नेत्यांसह अनेक लोकांनी गर्दी केली आहे. त्यांचे फार्महाऊस चेन्नईपासून काही दूर रेड हिल्स येथे आहे. SP Balasubrahmanyam Dies: लता मंगेशकर, रितेश देशमुख, सुप्रिया सुळे यांच्यासह चाहत्यांकडून एस पी बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली!

त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी ने सोशल मिडियावर या लिजेंडरी गायकाला राजकीय सन्मानासह अंतिम निरोप दिला जाईल असे सांगितले आहे. याबाबत त्यांनी एक प्रेस नोट प्रसिद्ध केली होती.

दरम्यान, एस पी बालासुब्रमण्यम यांनी तेलगू, तामिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम अशा चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी 16 भारतीय भाषांमध्ये 40,000 पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड करणारे ते विक्रमवीर गायक ठरले आहेत. त्याची गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. बालासुब्रमण्यम यांना त्यांना 6 वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला आहे. त्यांना 2001 मध्ये पद्मश्री आणि 2011 मध्ये पद्मभूषण किताबानं गौरविण्यात आलं आहे.