Abhishek Bachchan (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड मधील अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  आणि  त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांना कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चिंता करण्याची गरज नसून या दोघांमध्ये कोरोनाच्या हल्यक्या स्वरुपाची लक्षणे दिसून आली होती असे सांगण्यात येत आहे.  तसेच अमिताभ आणि अभिषेक यांची प्रकृती स्थिर आहे.(ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन यांची COVID-19 एंटीजन टेस्ट आली निगेटिव्ह) 

अभिषेक बच्चन याने नुकत्याच एका डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डेब्यु केला आहे. अभिषेक याची वेब सीरिज 'ब्रीद 2' नुकतीच अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या सीरिजसाठी अभिषेकने ज्या स्टुडिओ मध्ये डबिंग केले होते ते आता काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.  तर कोमल नाहटा यांनी सोशल मीडियात ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. कोमल यांनी ट्वीट मध्ये असे म्हटले आहे की, साउंड आणि व्हिजन डबिंग स्टुडिओ काही दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. कारण काही दिवसांपूर्वी ब्रीद या वेबसीरिजसाठी अभिषेक बच्चन डबिंगसाठी येत होता.(मुंबई: अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला BMC कडून सॅनिटाईझ; प्रवेशद्वारावर containment zone चा बॅनर)

शनिवारी रात्री अमिताभ बच्चन यांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची ट्वीट करत माहिती दिली. त्यानंतर अभिषेक याने सुद्धा त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट केले. अमिताभ यांनी ट्वीट करत असे म्हटले होते की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.  त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्स येण्याची वाट पाहत आहे. परंतु  परिवार आणि अन्य स्टाफ यांनी सुद्धा कोरोनाची चाचणी करावी. त्याचसोबत गेल्या 10 दिवसात जे कोणी मला भेटले त्यांनी ही सुद्धा कोविडची चाचणी करावी अशी विनंती अमिताभ बच्चन यांनी केली आहे.