
बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितली. ही बातमी ऐकताच अनेक चाहत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या दोघांमध्येही कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळली असल्याने चिंता करण्याचे कारण नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे यांच्याशी संपर्कात आलेल्या घरातील अन्य लोकांचीही कोरोना टेस्ट घेणे सुरु आहे. यात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचे रिपोर्ट समोर आले असून दोघींनाही तसेच आराध्याचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत.
"माझी प्रकृती स्थिर नानावटीतील कर्मचारी माझी नीट काळजी घेत आहेत. त्यामुळे चाहत्यांनी काळजी करु नका", असा संदेश बच्चन यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिला आहे. तसेच गेल्या 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असेही बिग बींनी सांगितले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना COVID-19 ची प्राथमिक लक्षणे आढळली असून प्रकृती स्थिर, कोविड योद्धांचे मानले विशेष आभार, Watch Video
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांची प्रकृती उत्तम असून सध्या त्यांना रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी नानावटीच्या डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व कर्मचा-यांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहे. तसेच त्यांच्यासह देशभरातील कोविड योद्धांना देवाची उपमा देत ते करत असलेल्या महान कार्याचे कौतुक केले आहे.